
धावत्या ट्रेनमध्ये जिवंत साप दाखवून प्रवाशांकडून पैसे उकळण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला असून, एक व्यक्ती प्रवाशांकडून पैसे घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी नेटकऱ्यांनी सोशल मीडियातून संताप व्यक्त केला आहे. साबरमती एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.
समोर आलेल्या व्हिडिओनुसार, एक व्यक्ती गळ्यात साप लटकवून साबरमती एक्सप्रेसमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर हा व्यक्ती साप हातात घेऊन प्रवाशांकडून पैसे मागत आहे. काही प्रवासी त्याला पैसे देखील देत आहेत, असा दावा या व्हिडिओ तून करण्यात आला आहे. साप घेऊन आलेल्या या व्यक्तीच्या कृतीने ट्रेनमधील प्रवाशांनी चिंता व्यक्त केली तर, अनेकांनी संताप व्यक्त केला.
मध्य प्रदेश येथील मुंगोली येथील रेल्वे स्थानकावर या प्रवाशाने ट्रेनमध्ये साप घेऊन प्रवेश केला. मेहनती लोकांकडून पैसे गोळा करण्याचा नवा धंदा सुरु झाला आहे, अशी पोस्ट एका एक्स युझरने व्हिडिओसह पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये भारतीय रेल्वे विभागाला टॅग करण्यात आले आहे.
व्हिडिओवर नेटकऱ्यांनी ट्रेन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पैशासाठी प्रवाशांना अशाप्रकारे भीती दाखवणे अथवा त्याचा गैरवापर करणे चुकीचे असल्याचे देखील नेटकऱ्यांनी म्हटले आहे. पोस्टची दखल घेऊन रेल्वेने प्रतिक्रिया दिली आहे. रेल्वेने प्रवाशाकडून त्याच्या प्रवासाची माहिती मागितली असून, मोबाईल नंबर मागितला आहे.
प्रवाशाला रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ आणि तक्रार क्रमांकावर देखील तक्रार करण्याचा पर्याय सुचवला आहे. रेल्वेने याप्रकाराची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याची हमी दिली आहे. दरम्यान, एखादा व्यक्ती अशाप्रकारे ट्रेनमध्ये चढून प्रवाशांना भीती दाखवून अथवा त्रास देऊन पैसे कसे गोळा करु शकतो, असा सावल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.