PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

Canada-India: कॅनडा वादाच्या पाश्वभूमीवर वृत्तवाहिन्यांना केंद्राच्या महत्त्वपूर्ण सूचना!

खलिस्तानी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन कॅनडासोबत भारताचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.

Manish Jadhav

Canada-India: खलिस्तानी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन कॅनडासोबत भारताचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यातच आता, केंद्राने गुरुवारी वृत्तवाहिन्यांना दहशतवादाशी संबंधित व्यक्तींच्या मुलाखती घेण्याचे टाळावे असा सल्ला दिला आहे.

दरम्यान, शीख फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताची भूमिका असल्याचा जाहीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला. त्यानंतर दोन्ही देशातील बिघडत चाललेल्या संबंधांदरम्यान हा सल्ला देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, दोन्ही देशांकडून जोरदार हालचाली सुरु असताना, गुरपतवंत सिंग पन्नू (एक वाँटेड दहशतवादी) एका वृत्तवाहिनीवर दिसला. मात्र, केंद्राने दिलेल्या सल्ल्यामध्ये पन्नू किंवा कॅनडाच्या (Canada) नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

दुसरीकडे, परराष्ट्र मंत्रालयाच्या निदर्शनास आले की, परदेशातील एक व्यक्ती ज्याच्या विरोधात दहशतवादासह गंभीर गुन्हे दाखल आहेत, ती भारतातील (India) कायद्याने प्रतिबंधित केलेल्या संघटनेशी संबंधित आहे, तिला एका वृत्तवाहिनीने चर्चेसाठी आमंत्रित केले होते.

त्या व्यक्तीने भारताची अखंडता, सुरक्षा, परकीय राज्याशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासंबंधी टिप्पणी केल्या आहेत.

"सरकार माध्यमांच्या स्वातंत्र्याचा आदर करते. मात्र, वृत्तवाहिन्यांनी कलम 20 च्या उप कलम (2) सह CTN कायदा, 1995 च्या तरतुदींचे पालन केले पाहिजे," असे अॅडवाइजरीमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, ज्यांच्यावर गंभीर गुन्हे/दहशतवादाचे आरोप आहेत अशा पार्श्वभूमीच्या व्यक्तींबद्दलचे रिपोर्ट्स/ संदर्भ देणे वृत्तवाहिन्यांनी देणे टाळावे. घटनेच्या कलम 19(2) अन्वये आणि CTN कायद्याच्या कलम 20 च्या उप-कलम (2) अंतर्गत नमूद केलेल्या वाजवी निर्बंधांचा विचार करुन, कायद्याने प्रतिबंधित केले आहे," असेही पुढे अॅडवाइजरीमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT