सौदी अरेबियाने भारताला दिला मोठा झटका, तुर्कीनंतर काश्मीर मुद्यावर...

Saudi Arabia: संयुक्त राष्ट्र महासभेच्या आयोजित बैठकीत सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान बिन अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरवर भाष्य केले आहे.
Saudi Arabia's Foreign Minister Prince Faisal bin Farhan bin Abdullah
Saudi Arabia's Foreign Minister Prince Faisal bin Farhan bin AbdullahDainik Gomantak
Published on
Updated on

Saudi Arabia: खलिस्तानी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन कॅनडासोबत भारताचा संघर्ष वाढत आहे. आता या राजनैतिक वादात सौदी अरेबियानेही भारताला अस्वस्थ करणारे काहीतरी केले आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या आयोजित बैठकीत सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान बिन अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरवर भाष्य केले आहे.

त्याचवेळी, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी आपल्या भाषणात सामान्य चर्चेदरम्यान जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता.

दरम्यान, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक ऑर्गनायझेशन (ओआयसी) ने आयोजित केलेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील मुस्लिमांना आपला पाठिंबा व्यक्त करताना सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान म्हणाले की, सौदी अरेबिया मुस्लिमांची इस्लामिक ओळख आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी मदत करेल. आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी उभे आहोत.

सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान यांनी बैठकीत ही माहिती दिली. "जम्मू काश्मीरसह कोणतेही क्षेत्र, जे संघर्ष आणि अशांततेने झगडत आहे, सौदी अरेबिया नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा आहे. इस्लामिक अस्मिता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात सौदी अरेबिया नेहमीच मुस्लिम (Muslim) लोकांच्या पाठीशी उभा आहे."

Saudi Arabia's Foreign Minister Prince Faisal bin Farhan bin Abdullah
Saudi Arabia: भारताच्या एका खेळीने सौदी नमला; कच्चा तेलाबाबत घेतला महत्वाचा निर्णय

बैठकीदरम्यान सौदी अरेबियाने जम्मू-काश्मीरच्या समस्येचे वर्णन क्षेत्राच्या सुरक्षा आणि स्थिरतेसाठी एक गंभीर आव्हान असल्याचे म्हटले. सौदी अरेबियाने इशाऱ्याच्या स्वरात म्हटले की, हा प्रश्न सुटला नाही तर या भागात आणखी अस्थिरता निर्माण होईल.

मध्यस्थी करण्याची ऑफर

फैसल बिन फरहान पुढे म्हणाले की, सौदी अरेबिया नेहमीच संघर्षात गुंतलेल्या पक्षांमध्ये मध्यस्थी करण्यात, संघर्ष कमी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय ठरावांच्या अनुषंगाने शांततापूर्ण तोडगा काढण्यसाठी प्रयत्नरत आहे.

हा प्रयत्न इस्लामी लोकांच्या समर्थनार्थ सौदी अरेबियाची अटळ भूमिका दर्शवतो.' सौदी अरेबियाचे मंत्री अब्दुलरहमान अल-रसी आणि परराष्ट्र मंत्री कार्यालयाचे महासंचालक अब्दुलरहमान अल-दाऊद यांनीही या बैठकीत भाग घेतला होता.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाबाबत भारताने सुरुवातीपासूनच स्पष्ट केले आहे की, आम्ही या मुद्द्यावर तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारणार नाही. भारताचे म्हणणे आहे की, या विषयावर कोणतीही चर्चा होईल तेव्हा ती द्विपक्षीय (भारत आणि पाकिस्तान) असेल.

Saudi Arabia's Foreign Minister Prince Faisal bin Farhan bin Abdullah
Saudi Arabia: वडिलांचा गळा चिरुन मृतदेहाचे केले तुकडे, अमेरिकन नागरिकाला सौदीत फाशीची शिक्षा

तुर्कस्तानने काय म्हटले?

तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी सर्वसाधारण चर्चेदरम्यान आपल्या भाषणात म्हटले की, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संवाद आणि सहकार्याद्वारे काश्मीरमध्ये न्याय्य आणि चिरस्थायी शांतता पुनर्संचयित केल्याने दक्षिण आशियातील प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. या दिशेने उचललेल्या पावलांना पाठिंबा देत राहू."

दुसरीकडे, तुर्कीच्या राष्ट्रपतींचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा त्यांनी नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. बैठकीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि पायाभूत सुविधांचे संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com