India Corona Update Internet
देश

India Corona Update: भारतात खरचं हर्ड इम्युनिटी आलीय का? चीनमधील कोरोना उद्रेकाचा देशावर कसा परिणाम होणार

विषाणूचा भारतावर कसा परिणाम होणार यावरून लोकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

चीनमध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे कोट्यावधी लोकांना कोरोना संसर्गाची लागन झाली आहे. 2019 साली डिसेंबरच्या महिन्यातच चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यानंतर मार्चमध्ये तो भारतात आला आणि दोन वर्षे मुक्काम केला. यात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. सध्या चीनमध्ये ज्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. तो BF.7 प्रकारचा विषाणू आहे. चीनमध्ये या विषाणूमुळे सध्या जनजीवन विस्कळीत झाले असून, पुन्हा एकदा सर्व जग अलर्ट झाले आहे. पण, या विषाणूचा भारतावर कसा परिणाम होणार यावरून लोकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे.

CSIR- सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) च्या एका उच्च अधिकाऱ्याने चीनमधील उद्रेकावरून आपले मत व्यक्त केले आहे. 'चीनमध्ये सध्या धुमाकूळ घालत असलेला BF.7 विषाणूचे भारतात गंभीर पडसाद उमडतील अशी परिस्थिती नाही. भारतीयांनी आधीच "हर्ड इम्युनिटी" विकसित केली आहे. या संसर्गाची तीव्रता डेल्टा एवढी घातक नाहीये.'

'भारतात आलेली कोरोनाची डेल्टा लाट खूप मोठी होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले. ओमिक्रॉनची देखील लहर आली आणि आपल्याकडे बूस्टर डोस सुरू ठेवण्यात आला. आपण सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेतली आहे.'

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी भारतात 201 नवीन कोरोनाव्हायरस रूग्णांची नोंद झाली आहे देशातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 3,397 एवढी झाली आहे. दरम्यान, भारतात कोरोनाच्या BF.7 या विषाणूची चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

चीनचे “शून्य कोविड धोरण” हे देखील त्या देशातील कोरोना संसर्ग उद्रेक होण्याचे एक कारण आहे. लसीकरण देखील कमी झाल्याने रूग्णसंख्या वाढली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT