पांचजन्य सागर मंथन यांच्यावतीने सुशासन संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांची मुलाखत घेण्यात आली. मुख्यमंत्री सावंत यांना यावेळी गोव्यातील समस्या, उपाय, सरकार, राजकारण यासह पर्यटनसंबधित विविध प्रश्न विचारण्यात आले. याचवेळी सावंत यांना सर्वोच्च न्यायालयाचे देशातील धर्मांतराच्या (religious conversion) घटना यावरून केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. गोव्याच्या संदर्भाने विचारलेल्या या प्रश्नाला मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर दिले.
काय म्हणाले मुख्यमंत्री प्रमोद सावंत?
"गोव्यात 1961 पासून समान नागरी कायदा आहे. आधीमधी राज्यात धर्मांतराच्या घटना घडत होत्या, मी हे सत्य नाकारणार नाही. आमच्या सरकराने अशा घटनांना पूर्णपणे आळा घातला आहे. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणावरून एक दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. राज्यातील सर्व धर्मांची लोकं गुण्यागोविंदाने राहतात, सर्वच लोक समान नागरी कायद्याचे पालन करतात. पण, स्थालंतर करून आलेल्या नागरिकांना काही लोक धर्मांतरासाठी प्रवृत्त करतात. पण यापुढे अशा कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही."
"गोव्याकडे नेहमीच लोकांनी पर्यटनाच्या नजरेतून पाहिले आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर येणारा युवावर्ग मुख्यत: मौजमजा करण्यासाठी येत असतो. पण, या पलिकडे सांस्कृतिक, हिंटरलॅन्ड आणि वेलनेस पर्यटन यासाठी देखील येत्या काळात गोवा ओळखला जाईल असा आमचा विश्वास आहे." असे प्रमोद सावंत म्हणाले.
"राज्यात नव्याने झालेले मोपा विमानतळ आणि आयुष हॉस्पिटल याचा देखील राज्यातील पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे. नवभारत निर्माण करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे, आणि त्यासाठी ते काम करत आहे. या प्रयत्नात गोवा मागे राहू नये यासाठी मी आणि माझे संपूर्ण मंत्रिमंडळ अहोरात्र काम करत आहे." असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.