China Corona Update: चीनमध्ये कोरोना संसर्गाने पुन्हा थैमान घातले आहे. सुरवातीला आटोक्यातील असलेल्या देशातील संसर्ग आता वेगाने पसरत असून, अनेकजण कोरोनाबाधित होत आहे. यासह तिथे विविध समस्या देखील निर्माण होत आहेत. संसर्गामुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच, कोरोनाच्या धास्तीने सरकारने रोजचा कोरोना अहवाल देखील प्रसिद्ध करण्यासही बंदी घातली आहे. मागील चार दिवासांपासून देशात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने विविध रूग्णांचे हाल होत आहेत.
(China Grapples With Covid Surge Faces Blood Shortage)
कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. देशातील सर्वच मोठी शहरे कोरोनाच्या विळख्यात सापडली असून लोकांना रुग्णालयात बेड मिळत नाहीयेत. दवाखान्याबाहेर लांबच लांब रांगा दिसत आहेत. चीन सरकार देशातील कोरोनाची आकडेवारी नेहमीप्रमाणेच लपवत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, सरकारच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये एक दिवसात तीन कोटी, 70 लाख कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. चीनमधील ही आकडेवारी जगाची डोकेदुखी वढवणारी आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या महिन्याच्या 20 डिसेंबरपर्यंत चीनच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 28 टक्के म्हणजेच 248 दशलक्ष लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ही आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, चीनच्या शून्य कोविड धोरणावर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. चीनच्या नैऋत्येकडील सिचुआन प्रांत आणि राजधानी बीजिंगमधील निम्म्याहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला असल्याचे सांगितले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.