UP Dainik Gomantak
देश

UP: ''सरकारी सुविधांचे कब्रस्तान'', गेटवरच गर्भवतीने दिला बाळाला जन्म

उत्तर प्रदेशच्या राजधानीला लागून असलेल्या उन्नाव जिल्ह्यातील बांगरमाऊ सामुदायिक आरोग्य केंद्रातून (Unnao Bangarmau CHC) एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशच्या राजधानीला लागून असलेल्या उन्नाव जिल्ह्यातील बांगरमाऊ सामुदायिक आरोग्य केंद्रातून (Unnao Bangarmau CHC) एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इथे प्रसूती वेदनांनी त्रस्त असलेली महिला नातेवाईकांसह रात्री उशिरा सीएचसीमध्ये पोहोचली, मात्र डॉक्टरांनी बेड नसल्याचे सांगून तिला परतवले. अनेकदा विनंती करुनही डॉक्टरांनी त्यांना दाखल करुन घेतले नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर तब्बल 2 तास गर्भवती महिला रुग्णालयाच्या गेटबाहेर तडफडत राहीली. वेदना वाढल्यानंतर महिलांनी हॉस्पिटलच्या गेटवरच या गर्भवतीची प्रसूती केली. त्यानंतरही महिलेला खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करावे लागले. याप्रकरणी सीएमओशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांना सीयूजी नंबर मिळाला नाही. त्यानंतर खासदार साक्षी महाराज यांनी डीएमला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्यास सांगितले आहे.

गेटवर प्रसूती

वास्तविक, बांगरमाऊ शहरातील पुरबिया टोला येथील रहिवासी असलेल्या शीबाला शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास प्रसूती वेदना सुरु झाल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना बांगरमाऊ सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉक्टरांनी (Doctor) महिलेला अ‍ॅडमिट न करता दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा सल्ला दिला. या दरम्यान गर्भवती तब्बल 2 तास रुग्णालयाच्या गेटबाहेर तडफडत राहीली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने कुटुंबात घबराट पसरली होती. वेदना वाढल्यानंतर प्रसूतीतज्ज्ञांसोबत उपस्थित महिलांनी हॉस्पिटलच्या गेटवरच प्रसूती केली. यानंतर कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले.

खासदार साक्षी महाराज यांनी चौकशीचे आदेश दिले

बांगरमाऊ सामुदायिक आरोग्य केंद्राच्या या निष्काळजीपणावरुन सर्वसामान्यांना कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत, याचा अंदाज आला असेल. गर्भवती महिलेचा भाऊ वसीमने बंगारमाऊ सीएचसीच्या डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचवेळी सीएमओंनी यावेळी माध्यमाशी बोलण्याचे टाळले. मात्र, जिल्ह्यातील बंद पडलेले सीएचसी आणि पीएचसी लवकरच सुरु करण्याच्या सूचना डीएमला दिल्याचे खासदार साक्षी महाराज यांनी सांगितले. माझ्याकडेही अशा तक्रारी आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT