Diwali celebrated after 75 years in Jammu and Kashmir's Sharda Mata temple, a sight seen for the first time since independence. Dainik Gomantak
देश

Diwali in J&K: जम्मू-काश्मीरच्या 'या' मंदिरात 75 वर्षांनंतर साजरी झाली दिवाळी, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाहिलं असं दृश्य

Jammu and Kashmir: देशाच्या फाळणीपूर्वी येथे एक मंदिर आणि गुरुद्वारा होता, जिथे 1947 पर्यंत दिवाळी साजरी केली जात होती. त्यानंतर काही समाजकंटकांनी मंदिर आणि गुरुद्वारावर हल्ला करून ते जाळले.

Ashutosh Masgaunde

Diwali celebrated after 75 years in Jammu and Kashmir's Sharda Mata temple, a sight seen for the first time since independence: देशभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. लहान मुले आणि प्रौढही फटाके फोडत असल्यामुळे आकाश उजळून निघाले आहे. दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील एका मंदिरात दिवाळी साजरी करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील टिटवाल येथे असलेले शारदा मंदिर एलओसीला लागून आहे. 'सेव्ह शारदा कमिटी'चे संस्थापक आणि प्रमुख रवींद्र पंडिता यांनी सांगितले की, 75 वर्षांत प्रथमच दिवाळीला येथे पूजा होत आहे. 75 वर्षांनंतर लोकांना ही पूजा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे ही आनंदाची बाब आहे.

शारदा मंदिरातील पूजेला १०४ विजय शक्ती ब्रिगेडचे कमांडर कुमार दास आणि सेव्ह शारदा समितीचे प्रमुख रवींद्र पंडिता उपस्थित होते.

यावेळी त्रिभोणी गावातील स्थानिक लोक आणि शीख बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सत्यनारायणाची पूजा करून उपस्थितांना मिठाई वाटण्यात आली.

यावेळी तहसीलदार तंगधर इयाद कादरी, कार्यकर्ते डॉ.संदीप मावा, शारदा समिती सदस्य एजाज खान, इफ्तिखार, निवृत्त कॅप्टन इलियास, हमीद मीर व त्रिभोणीचे शिख उपस्थित होते.

तत्पूर्वी, पीओकेच्या नागरी समाजाचे सदस्य चिल्हानाच्या दिशेने आले आणि त्यांनी रविंदर पंडिता आणि सदस्यांचे पांढरे झेंडे फडकावून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी टीटवाल सिव्हिल सोसायटीतर्फे केकही कापण्यात आला.

देशाच्या फाळणीपूर्वी येथे एक मंदिर आणि गुरुद्वारा होता, जिथे 1947 पर्यंत दिवाळी साजरी केली जात होती. त्यानंतर समाजकंटकांनी मंदिर आणि गुरुद्वारावर हल्ला करून ते जाळले. त्यानंतर तिथे पुन्हा कधीच दिवाळी साजरी झाली नाही, पण आता 75 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली.

शारदापीठ हे देवी सरस्वतीचे एक प्राचीन मंदिर आहे, जे किशनगंगा नदी (नीलम नदी) च्या काठावर शारदाजवळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. यावर भारताचा अधिकार आहे. आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि नयनरम्य आहे. शारदा पीठ मुझफ्फराबादपासून सुमारे 140 किमी आणि कुपवाड्यापासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये या भूमीवर पारंपारिक पूजा करण्यात आली. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सेवा शारदा समितीने मंदिर बांधकाम समिती स्थापन केली. या समितीत तीन स्थानिक मुस्लिम, एक शीख आणि एक काश्मिरी पंडित यांचा समावेश होता.

उत्तर काश्मीरमधील टिटवाल गावात 28 मार्च रोजी माता शारदा मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. मंदिराबरोबरच गुरुद्वारा आणि मशिदीचेही बांधकाम सुरू झाले. सेव्ह शारदा समितीच्या (एसएससी) अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला येथे बंधुभावाचे उदाहरण ठेवायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: ..लो मैं आ गया! पुन्हा पावसाची वापसी, विजांसह कोसळणार सरी; 2 दिवस यलो अलर्ट जारी

Goa Politics: खरी कुजबुज; बिहारमधील फॉर्म्युला गोव्यात?

Goa To Indore Flight: खुशखबर! गोवा ते इंदूर विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून सुरू; दिल्लीतून आणखीन 3 विमाने येणार

Anmod Ghat: 'अनमोड'बाबत मोठी अपडेट! महामार्गाच्या विस्ताराला ‘पर्यावरणा’ची स्थगिती; प्रस्तावात त्रुटी असल्याचा दावा

Mapusa Theft: ‘आवाज केला तर ठार मारू’! म्हापशातील चोरीने गोवा हादरला; चोरांनी चहा पिला, फळे खाल्ली, टॅक्सीने गाठले कर्नाटक; वाचा घटनाक्रम..

SCROLL FOR NEXT