Rahul Gandhi Car Video Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडला? भाजपने शेअर केला व्हिडिओ Watch

Rahul Gandhi Video : राहुल कारमधून खाली उतरुन त्यांची चौकशी देखील केली नाही, असे भाजप नेते पूनावाला यांनी म्हटले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडल्याचा आरोप भाजपने केला आहे. बिहारमध्य वोट अधिकार यात्रे दरम्यान घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे. ही वोट अधिकार यात्रा नव्हे तर क्रश जनता यात्रा असल्याचे म्हणत भाजपने नेत्याने व्हिडिओ सोशल केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल मीडिया एक्स या प्लॅटफॉर्मवरुन शेअर केला आहे. राहुल गांधी यांच्या कारने पोलिस कॉनस्टेबलला चिरडले. यात कॉनस्टेबल गंभीर जखमी झाला आहे. पण, राहुल कारमधून खाली उतरुन त्यांची चौकशी देखील केली नाही, असे पूनावाला यांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या एसआरएनंतर विरोधकांनी निदर्शने केली. विरोधकांकडून वोट अधिकार यात्रा सुरु करण्यात आली असून. ससाराम येथून १६ दिवसांच्या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या मार्चमध्ये १,३०० किमी अंतर पार केले जाणार आहे. वीस जिल्ह्यातून जाणाऱ्या या यात्रेची पटना येथे ०१ सप्टेंबर रोजी सांगता होईल.

राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतदानात छेडछाड आणि लोकशाहीवर हल्ला केल्याचा आरोप केला. राहुल यांनी याबाबत न्यायालयाने देखील दखल घेण्याची गरज व्यक्त केली आहे. लोकशाही धोक्यात असल्याचे म्हणत न्यायालयाने यात लक्ष घालण्याची गरज असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 

दरम्यान, भाजपने राहुल गांधींच्या आरोपांचे खंडन केले आहे. खोटं बोलून राहुल गांधी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. याची जबाबदारी कोण घेणार? राहुल गांधी देशाची माफी मागतील का?  असा सवाल भाजप नेते गौरव भाटीया यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT