blood sugar level test Dainik Gomantak
देश

Blood Sugar Testing: रक्तातील साखर तपासताना सुईचा त्रास होतो? वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांनी सुचवल्या सोप्या टिप्स

Diabetes Care Advice: डॉ. रोशनी यांच्या मते अनेक लोकं नकळत ही साखर तपासण्याची प्रक्रिया आवश्यकतेपेक्षा जास्त वेदनादायक बनवतात

Akshata Chhatre

sugar testing discomfort healthcare tips

तुम्हाला मधुमेहाचा त्रास आहे का? मधुमेह असलेल्या लोकांसाठी, रक्तातील साखरेची पातळी तपासणे हा दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असतो मात्र अनेकवेळा हा भाग भयानक ठरू शकतो. अग्रगण्य एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. रोशनी संघानी यांनी मधुमेहावर त्यांचे मत मांडले. डॉ. रोशनी यांच्यामते अनेक लोकं नकळत ही साखर तपासण्याची प्रक्रिया आवश्यकतेपेक्षा जास्त वेदनादायक बनवतात.

रक्तातील साखर तपासताना एका सुईच्या मदतीने रक्ताचा थेंब वापरावा लागतो आणि ही प्रक्रिया वेदनादायक बनते, पण डॉ. रोशनी म्हणतात की बोटाच्या मध्यभागी सुई टोचणं आपली पहिली चूक आहे. माणसाची बोटं अत्यंत संवेदनशील असतात त्यामुळे "मध्यभागी सुई टोचणं केवळ वेदनादायक नाही तर अनावश्यक देखील ठरतं."

रक्त तपासणीची सोपी प्रक्रिया काय?

रक्तातील साखर तपासताना वेदना कमी व्हावी म्हणून डॉ. संघानी यांनीएक सोपी युक्ती सुचवली आहे. त्या म्हणतात की "नमस्ते" हावभावात तुमचे तळवे एकत्र करा. या कृतीमुळे तुमच्या बोटांच्या कडा दृश्यमान होतात, ज्या बोटांच्या टोकांपेक्षा कमी संवेदनशील असतात. आणि अशा कमी संवेदनशील भागांना सुई टोचल्याने वेदना लक्षणीयरीत्या कमी होतात.

ज्यांना दररोज बोटाला सुई टोचून साखरेचं प्रमाण तपासणं कठीण वाटतं त्यांच्यासाठी डॉक्टरांनी ग्लुकोज मॉनिटर्सचा (CGMs) एक मौल्यवान पर्याय सुचवला आहे. त्वचेला चिकटून राहणारी अशी उपकरणे दिवसभर आणि रात्री रक्तातील साखरेची पातळी सतत ट्रॅक करतात.

तुम्ही कुठल्या मार्गे साखर तपासात यापेक्षा तुम्ही दररोज साखरेचं प्रमाण तपासता का नाही हे महत्वाचं आहे असं डॉ. रोशनी म्हणतायत. "तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तुमच्या एकूण आरोग्याबद्दल आणि तुमचे शरीर दैनंदिन जीवन कसे व्यवस्थापित करत आहे याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करते," असं डॉ. म्हणाल्या आहेत. दररोज आणि नीट परीक्षण केल्याने तुम्हाला या आजारावर काबू मिळवणं सोपं जाणार आहे.

डॉक्टरांनी सुचवलेल्या अशा काही सोप्या टिप्सचा समावेश करून आणि CGM सारखे पर्यायी पर्याय शोधून मधुमेह असलेल्या व्यक्ती रक्तातील साखरेची चाचणी त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये कमी वेदनादायक बनवू शकतात तसेच या प्रक्रियेला अधिक उत्तम प्रकारे जीवनाचा भाग बनवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

SCROLL FOR NEXT