Goa Pollution Issues: पर्यावरणाचा बळी देऊन कसला विकास साधताय? आलेमाव सरकारवर कडाडले; प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे काढले धिंडवडे

Goa Budget Session 2026: गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारला विविध आघाड्यांवर घेरले असून राज्याच्या ज्वलंत समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
yuri alemao
yuri alemaoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारला विविध आघाड्यांवर घेरले असून राज्याच्या ज्वलंत समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था, किनारपट्टीवरील सुरक्षेचा अभाव आणि वाढते प्रदूषण या मुद्द्यांवरुन त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गोव्याचे पर्यावरण आणि जनआरोग्य धोक्यात आले असून सरकार केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

आरोग्यासोबतच गोव्याच्या किनारपट्टीच्या सुरक्षेचा मुद्दाही आलेमाव यांनी आक्रमकपणे मांडला. गोव्याची समुद्रकिनारपट्टी ही पर्यटनाचा कणा आहे, मात्र तिथे देखरेखीचा अभाव असल्याने अंमली पदार्थांची तस्करी आणि अनधिकृत कृत्ये वाढली आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि किनारपट्टीच्या रक्षणासाठी अद्ययावत पाळत ठेवणे गरजेचे असून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना अधिक सक्षम करण्याची मागणी त्यांनी केली.

yuri alemao
Goa Budget Session 2026: मिराबाग बंधाऱ्यावरुन विधानसभेत हाय व्होल्टेज ड्रामा, प्रेक्षक गॅलरीत आंदोलकांची घोषणाबाजी; मुख्यमंत्र्यांचा चढला पारा

तसेच, प्रदूषणाच्या (Pollution) मुद्द्यावरुन त्यांनी कॅसिनो आणि कोळसा वाहतुकीवर जोरदार हल्ला चढवला. मांडवी नदीत असलेल्या कॅसिनोमुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे, कोळशाच्या प्रदूषणामुळे मुरगाव आणि आसपासच्या भागातील नागरिकांचे श्वसनाचे विकार वाढत आहेत. कोळसा वाहतूक नियंत्रित करण्यात आणि कॅसिनोचे सांडपाणी रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा आलेमाव यांनी केला. गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि जनतेच्या आरोग्याचा बळी देऊन विकास साधला जाऊ शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारचे कान टोचले. या अधिवेशनात आलेमाव यांच्या या टोकदार प्रश्नांमुळे सत्ताधारी पक्षाला उत्तर देताना मोठी कसरत करावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com