High Blood Sugar: रक्तातील साखर कमी करण्यासाठी 'पाच' सोप्या टीप्स; जाणून घ्या फायदेशीर उपाय

Blood sugar control tips: रक्तातील साखर वाढल्यास अनेक आजारांना निमंत्रण ठरू शकते, त्यामुळे साखरेवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.
High Blood Sugar: रक्तातील साखर कमी करण्यासाठी 'पाच' सोप्या टीप्स; जाणून घ्या फायदेशीर उपाय
Blood Sugar ControlDainik Gomantak
Published on
Updated on

Blood sugar control tips

शुगर किंवा रक्तातील साखर म्हणजे शरीरातील ग्लुकोजची पातळी. उपाशी पोटी रक्तातील साखरेची सामान्य पातळी 70-100 mg per deciliter (MG/DL) असावी. आणि जेवण केल्यानंतर दोन तासांनी 140 MG/DL पेक्षा कमी असावी. पण अलिकडे अनेकांसाठी शुगरची समस्या डोकेदुखी ठरली आहे. शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी काही उपाय सुचवले जातात.

आहारतज्ञ चारमेन हा डोमिंग्वेझ यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून तासाभरात साखर नियंत्रित करण्याच्या काही टिप्स दिल्या आहेत. डोमिंग्वेझ यांच्या मते, कोणीही काही व्यायाम करून तासाभरात रक्तातील साखरेची पातळी कमी करु शकतो.

का वाढते रक्तातील साखर

अति ताण, डिहायड्रेशन, जास्त साखर खाणे, कॅफिन, पुरेशी झोप न घेणे आणि शारीरिक फिटनेस न सांभाळणे, अशा अनेक कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, असे वैद्यकीय तज्ञ सांगतात.

High Blood Sugar: रक्तातील साखर कमी करण्यासाठी 'पाच' सोप्या टीप्स; जाणून घ्या फायदेशीर उपाय
Vedanta Mining Goa: 'वेदांता'चा प्रस्ताव अमान्य, शेतकरी मागण्यांवर ठाम; महिन्यानंतरही पिळगावात आंदोलन सुरुच

रक्तातील साखर वाढल्यास अनेक आजारांना निमंत्रण ठरू शकते, त्यामुळे साखरेवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. भरपूर पाणी पिणे सतत हायड्रेटेड राहणे शरीरातील अतिरिक्त साखर बाहेर काढण्यास मदत करू शकते. योगासने किंवा चालणे यासारखा हलका व्यायाम तुमची साखर कमी करू शकतो.

जोरात चालणे, जॉगिंग, धावणे, पोहणे, सायकलिंग आणि योगासने यासारख्या शारीरिक हालचाली साखर नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहेत, असे वैद्यकीय तज्ञ सांगतात.

High Blood Sugar: रक्तातील साखर कमी करण्यासाठी 'पाच' सोप्या टीप्स; जाणून घ्या फायदेशीर उपाय
Digital Detox: डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? कसं करावं, फायदे काय? वाचा सविस्तर

साखर नियंत्रित करण्यासाठी टीप्स

१) विनासाखरेची ग्रीन टी घ्या

२) 20-30 मिनिटे चाला

३) 15-20 मिनिटे पायऱ्या चढा

४) चार ग्लास पाणी प्या

५) आल्याचा चहा प्या

Disclaimer: हा लेख फक्त माहितीपर असून, योग्य आरोग्यसंबधित सल्ला आणि माहिती घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना भेटा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com