Dhirendra Shastri
Dhirendra Shastri Dainik Gomantak
देश

Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री पून्हा बरळले! साईबाबांबद्दल वादग्रस्त विधान

दैनिक गोमन्तक

Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे गेल्या काही दिवसांपासून बरेच चर्चेत आहेत. धीरेंद्र शास्त्रींनी संत तुकारामांच्या पत्नीबद्दल केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती.

आता पुन्हा बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. दरबारात एका व्यक्तीने साईबाबांबद्दल प्रश्न विचारल्यानंतर कोल्ह्याची कातडी पांघरुन कोणी सिंह होऊ शकत नाही. कोल्हा कोल्हाच राहील.

साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात मात्र साईबाबा देव असू शकत नाहीत. आपल्या धर्माच्या शुक्राचार्यांनी साईबाबांना देव मानले नाही. शुक्राचार्य सनातनी धर्माचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांचे म्हणणे ऐकणे आपल्या प्रत्येक सनातन्याचे काम आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याआधी धीरेंद्र शास्त्रींनी आपल्या एका कार्यक्रमात संत तुकारामांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. संत तुकारामांबद्दल बोलताना धीरेंद्र शास्त्रींनी म्हटले होते की त्यांची पत्नी रोज त्यांना मारत होती.

पुढे त्यांनी म्हटले आहे त्यांची पत्नी त्यांना मारत होती म्हणून ते देवावर प्रेम करु शकले. जर प्रेमळ पत्नी मिळाली असती तर ते देवावर प्रेम करु शकले नसते. त्यावेळीदेखील त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.

दरम्यान, नागपूर( Nagpur )मध्ये जेव्हा धीरेंद्र शास्त्रींचा कार्यक्रम आयोजित केला होता, तेव्हा आपल्या कार्यक्रमात सांगत असलेल्या गोष्टींमधून अंधश्रद्धा पसरवत असल्याचे सांगत अंनिसने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तसेच धीरेंद्र शास्त्रींना आरोप खोटे सिद्ध करण्यासाठी खुले आवाहन दिले होते. त्यावेळी हा वाद चांगलाच गाजला होता.

आता साईबाबांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर साईभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या भावनांचा अनादर केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याबरोबरच, धीरेंद्र शास्त्रींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

Goa Today's Live News: कॅथलिक विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी - चर्चिल आलेमाव

Sam Pitroda: ‘’भारतात पूर्वेकडील लोक चिनी तर दक्षिणकेडील लोक आफ्रिकनसारखे दिसतात...’’ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा पुन्हा बरळले

Lok Sabha Election 2024: मतदान करतानाचा फोटो काढताना फातोर्डा येथे महिलेला पकडले; चौकशीअंती सुटका

SCROLL FOR NEXT