Weather Update: पुढिल 3 दिवस वादळ अन् मुसळधार पावसाची शक्यता, जाणुन घ्या हवामान अपडेट

देशभरात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Weather Update
Weather Update Dainik Gomantak

Weather Update: दिल्लीत काल रात्री मुसळधार पावसानंतर वातावरण आल्हाददायक झाले आहे. दक्षिण भारतातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे. पाऊस आणि वादळी वार पुढील काही दिवस अशीच सुरू राहणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.

5 एप्रिलपर्यंत तामिळनाडू, केरळ, आंध्र, तेलंगणा, कर्नाटकात वादळासह पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये या आठवड्यात पावसामुळे हवामान आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. 

द वेदर चॅनलच्या मेट टीमच्या म्हणण्यानुसार, दक्षिण भारताच्या अंतर्गत भागांवर एक नवीन कुंड आहे. येत्या काही दिवसांत त्याचा परिणाम संपूर्ण परिसरात दिसून येईल.  हवामान खात्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवस पावसाची (Rain) ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. 

चेन्नईतील आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्राने रानीपेट्टई, वेल्लोर, तिरुवन्नमलाई, तिरुपत्तूर, कृष्णगिरी, धर्मपुरी, सालेम, इरोड, निलगिरी, कोईम्बतूर, थिरुपूर, नमक्कल, करुर, डुक्‍मक्कल आणि करूर या उत्तर आणि वायव्य जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज दर्शवला आहे. स्थानिक हवामानाबाबत रहिवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील अनेक भाग जलमय झाले आहेत. IMD च्या नवीन आकडेवारीनुसार, आज (2 एप्रिल) दिल्लीत हलका पाऊस किंवा रिमझिम पावसासह ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे. किमान तापमान 16 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील, असे अंदाजात म्हटले आहे. 

Weather Update
West Bengal: भर रस्त्यात भाजप नेत्यावर बेछुट गोळीबार करुन हत्या, बंगाल पोलीसांचा तपास सुरु

या राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे 

हवामान खात्यानुसार अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याच वेळी, 2 एप्रिलपर्यंत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com