Dharmendra Pradhan on Cockroach Janta Party Dainik Gomantak
देश

Cockroach Janata Party: 'कॉकरोच जनता पार्टी' म्हणजे देश अस्थिर करणाऱ्यांची ‘बी-टीम’, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार!

Dharmendra Pradhan On Cockroach Janata Party: शिक्षण मंत्र्यांनी या उपरोधिक आणि व्यंग्यात्मक विरोध प्रदर्शनाला देशाला अस्थिर करण्याचे एक पूर्वनियोजित कारस्थान म्हटले.

Manish Jadhav

Dharmendra Pradhan On Cockroach Janata Party: 'नीट' परीक्षेत झालेला कथित घोटाळा आणि पेपर लीक प्रकरणानंतर देशभरातील विद्यार्थ्यांमधील संताप अजूनही शांत झालेला नाही. या सर्व गदारोळात सोशल मीडियापासून ते थेट रस्त्यावरील आंदोलनांपर्यंत चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’वर आता सरकारने टीकास्त्र डागले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांदाच या 'सीजेपी' संघटनेवर जाहीरपणे आपली भूमिका मांडली. शिक्षण मंत्र्यांनी या विरोध प्रदर्शनाला देशाला अस्थिर करण्याचे एक पूर्वनियोजित कारस्थान म्हटले.

धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) सीजेपीवर टीका करताना म्हणाले की, ही संघटना दुसरी तिसरी काही नसून देशात अराजकता आणि अस्थिरता निर्माण करु पाहणाऱ्या विघटनकारी शक्तींची ‘बी-टीम’ आहे. त्यांनी अत्यंत कडक शब्दांत आरोप केला की, जे लोक लोकशाही व्यवस्थेत जनतेकडून पूर्णपणे नाकारले गेले आहेत, तेच आता वेगवेगळ्या रुपात समोर येत असून संपूर्ण शिक्षण आणि प्रशासकीय व्यवस्थेला लक्ष्य करत आहेत.

शिक्षण मंत्र्यांनी पुढे असेही म्हटले की, हे तेच लोक आहेत जे देशाचे तुकडे करु पाहणाऱ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करतात आणि आता त्यांची ओळख पूर्णपणे पटली. काही विशिष्ट घटकांना देशाची प्रगती आणि विकासावर अजिबात विश्वास नाही, अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे हे मोठे वक्तव्य अशा वेळी आले, जेव्हा अवघ्या एका दिवसापूर्वी देशभरातील 22 लाखांहून अधिक वैद्यकीय विद्यार्थ्यांनी अत्यंत कडक सुरक्षेत पुन्हा आयोजित केलेल्या 'नीट' परीक्षेत भाग घेतला. गेल्या महिन्यात पेपर लीकच्या गंभीर आरोपांमुळे आधी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतरच ‘कॉकरोच जनता पार्टी’ सातत्याने रस्त्यावर उतरुन या कथित घोटाळ्याचा निषेध करत होती आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होती. या वादाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावेळी प्रशासनाने कोणतीही कसर सोडली नव्हती. याच कारणामुळे ही पुनर्परीक्षा देशातील सशस्त्र दल आणि राज्य पोलिसांच्या अभूतपूर्व आणि कडक सुरक्षा कडेकोट बंदोबस्तात पार पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT