Summer Farming  Dainik Gomantak
देश

उष्णतेच्या लाटेचा अंदाज घेत कृषी खात्याने दिला देशातील शेतकरी बांधवांना सल्ला

शेतकरी बांधवांनो रोपवाटिका आणि फळबागांची अशी घ्या काळजी

दैनिक गोमन्तक

भारतीय कृषी संशोधन संस्थेने ( IARI ) उष्णतेची लाट आणि वातावरणाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांना काही सुचना दिल्या आहेत. उष्णतेच्या लाटेची (Heat Wave) शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी (Farmers) काही सुचना जारी केल्या आहेत. आगामी काळात उष्णतेची लाट आणि वाढत्या तापमानाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी भाजीपाला, रोपवाटिका, फळबागांना नियमित अंतराने हलके सिंचन करावे, असे संस्थेच्या कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले. (Summer Farming Tips)

उष्माघातापासून रोपवाटिकांचे आणि वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी विशेष उपायांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. धान्य साठवणुकीत ठेवण्यापूर्वी साठवणगृहाची साफसफाई करून धान्य चांगले वाळवावे. शेतातील कचरा जाळून किंवा दाबून नष्ट करावा. स्टोअर हाऊसच्या छतावर, भिंतींवर आणि जमिनीवर 100मीमी. पाण्यात मॅलाथिऑन 50 EC मिसळून फवारणी करा.

जुन्या गोण्या साठवण्यासाठी वापरावयाच्या असल्यास त्याचा एक भाग मॅलेथिऑन पाण्यात मिसळून 10 मिनिटे भिजवून सावलीत वाळवाव्यात, असे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. या हंगामात गव्हाचे पीक घेणे चांगले आहे. मात्र शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके बांधून ठेवावीत, अन्यथा जोरदार वारा किंवा वादळामुळे पीक एका शेतातून दुसऱ्या शेतात जाऊ शकते. मळणीनंतर धान्य साठवण्यापूर्वी चांगले वाळवावे.

पुरेसा ओलावा असलेल्या शेतात मूग पेरा

मूग पिकाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी सुधारित बियाणे पेरले पाहिजे. मूग-पुसा विशाल, पुसा रत्न, पुसा- 5131, पुसा बैसाखी, पीडीएम-11, एसएमएल-32, एसएमएल-668 आणि सम्राट बियाणे पेरणी साठी वापरण्याचा सल्ला दिला आहे. पेरणीपूर्वी बियाण्यांवर विशिष्ट रायझोबियम आणि फॉस्फरसची प्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी शेतात पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.

प्रमाणित स्त्रोतांकडून बियाणे खरेदी करा

सध्याचे तापमान फ्रेंच बीन, भाजीपाला चवळी, चवळी, भिंडी, लौकी, काकडी, तुरी आणि उन्हाळी हंगाम मुळा यांच्या थेट पेरणीसाठी अनुकूल आहे. कारण, हे तापमान बियांच्या उगवणासाठी योग्य असते. प्रमाणित स्त्रोताकडून सुधारित दर्जाचे बियाणे पेरा. पेरणीच्या वेळी शेतात पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.

कीटकांपासून संरक्षण कसे करावे

भेंडी पिकावर माइट किडीचे पडण्याची शक्यता असते म्हणून त्यावर सतत निरीक्षण ठेवा. अधिक कीटक आढळल्यास इथयान 1.5-2 मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या हंगामात, वेळेवर पेरणी केलेल्या कांदा पिकावर काही रोगांचे आक्रमण होवू शकते त्यामुळे कांद्यावर येणाऱ्या हिरव्या पालीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वांगी आणि टोमॅटोच्या पिकाचे अंकुर आणि फळांच्या बोंडापासून संरक्षण करण्यासाठी, प्रभावित फळे आणि कोंब गोळा करून नष्ट करा. किडींची संख्या जास्त असल्यास स्पिनोसॅड कीटकनाशक 48 ईसी 1 मिली/4 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रब्बी पिकाची काढणी झाली असल्यास शेतात शेणखत टाकावे, असे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले. त्याचबरोबर गांडूळ खताचाही वापर करावा. यामुळे जमीन पावसाळ्यात येणाऱ्या पिकासांठी तयार होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT