Weather Update: पुढील तीन दिवस या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याचा इशारा; उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये येणार उष्णतेची लाट
Weather Update
Weather UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Weather Update: हवामान खात्याने उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा इशारा दिला आहे. मात्र, अशी काही राज्ये आहेत जिथे सलग तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. (The weather department has warned light to heavy rains for the next three days)

देशातील अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यातच जून-जुलैसारखी उष्णता जाणवू लागली होती. 121 वर्षांनंतर मार्च महिना इतका उष्ण पाहायला मिळाला. एप्रिलमध्ये तापमानाचा पारा चढू लागला असून हवामान खात्याने (weather Department) उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मात्र, अशी काही राज्ये आहेत जिथे सलग तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि गुजरातमध्येही पारा चढा राहील. नैऋत्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भाग, राजस्थान, गुजरातचा काही भाग, छत्तीसगड, झारखंड आणि तेलंगणामध्ये उष्णतेची लाट राहील असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

तर हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या जोरदार नैऋत्य वाऱ्यांमुळे पुढील पाच दिवस अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये जोरदार पाऊस पडेल. 2 ते 4 एप्रिल दरम्यान पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या उत्तर भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मेघालयात ३ ते ४ एप्रिल रोजी मुसळधार पावसाची (Heavy rain) शक्यता आहे.

121 वर्षातील सर्वात उष्ण मार्च

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 121 वर्षांतील यावेळचा मार्च हा सर्वात उष्ण ठरला असून 1908 नंतरच्या सर्वात कमी पावसाची नोंद मार्चमध्ये झाली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या काळात उत्तर भारतात (India) असामान्यपणे उष्णतेसह कमी पाऊस पडतो. त्यामुळे त्याचा परिणाम हा दक्षिण भारतातील हवामानावर (Climate) परिणाम झाला. यावेळी देशभरात मार्च महिन्याचे सरासरी कमाल तापमान ३३.१० अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे गेल्या १२१ वर्षांतील सर्वोच्च तापमान होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com