Bangladesh High Commission Protest Dainik Gomantak
देश

हिंदू तरुणाच्या हत्येचे दिल्लीत तीव्र पडसाद! बांगलादेश हाय कमिशनबाहेर हिंदू संघटनांचे उग्र आंदोलन; बॅरिकेड्सवर चढून आंदोलकांचे 'हनुमान चालीसा' पठण VIDEO

Bangladesh Minority Attacks : बांगलादेशातील मैमनसिंह शहरात एका हिंदू तरुणाची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली.

Manish Jadhav

Bangladesh High Commission Protest : बांगलादेशातील मैमनसिंह शहरात एका हिंदू तरुणाची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज (23 डिसेंबर) राजधानी दिल्लीतील बांगलादेश हाय कमिशनबाहेर विराट निदर्शने करण्यात आली. विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि विविध हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन बांगलादेश सरकार आणि तेथील कट्टरपंथी शक्तींविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न आणि पोलिसांशी झडप

आंदोलनाचा वाढता जोर लक्षात घेता दिल्ली (Delhi) पोलिसांनी हाय कमिशनबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. मात्र, संतप्त आंदोलकांनी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झडप झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. हातात निषेधाचे फलक घेतलेले तरुण बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाची मागणी करत होते. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्सवर चढून 'हनुमान चालीसा'चे पठण करत आपला निषेध नोंदवला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बांगलादेशातील ती अंगावर काटा आणणारी घटना

बांगलादेशात (Bangladesh) सध्या सुरु असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर दीपू चंद्र दास (वय 25) या हिंदू युवकाची ईशनिंदेच्या खोट्या आरोपावरुन जमावाने हत्या केली. दीपू हा मैमनसिंह येथील एका कारखान्यात काम करत होता. कट्टरपंथीयांच्या जमावाने कारखान्याला घेराव घालून दीपूला बाहेर ओढले आणि त्याचा जीव जाईपर्यंत त्याला मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता नराधम जमावाने त्याचा मृतदेह झाडाला लटकवून पेटवून दिला. या अमानवीय घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातील हिंदू समुदायामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

देशभरात आंदोलनाचे लोन

केवळ दिल्लीतच नव्हे, तर भोपाळ, कोलकाता आणि मुंबईसह देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये या घटनेचे पडसाद उमटत आहेत. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबवावेत आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या मानवी हक्कांच्या उल्लंघनाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन हिंदू संघटनांनी केले आहे. सुरक्षा यंत्रणा सध्या हाय कमिशन परिसरावर ड्रोनद्वारे नजर ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

SCROLL FOR NEXT