Sidhu Moose Wala
Sidhu Moose Wala Dainik Gomantak
देश

सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात पोलिसांना मोठे यश, दोन शूटर्स गजाआड

दैनिक गोमन्तक

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी शूटर्सच्या मॉड्यूल प्रमुखासह दोन मुख्य शूटर्संना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली आहेत. (Delhi Police Special has arrested two shooters in connection with the murder of Sidhu Moose Wala)

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी तेच शूटर आहेत, ज्यांनी मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. ते लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असून त्यांचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची पंजाबच्या मानसा जिल्ह्यात 29 मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती, ज्यांचा लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीशी संबंध असल्याचा आरोप आहे. मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. 14 जून रोजी पंजाब पोलिसांनी (Police) लॉरेन्सला अटक केली आणि त्याला एक दिवसाच्या ट्रान्झिट रिमांडवर पंजाबला (Punjab) नेले.

पंजाब पोलिसांनी दिल्लीच्या (Delhi) पटियाला हाऊस न्यायालयात युक्तिवाद केला होता की, आमच्या तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील लॉरेन्स बिश्नोई हा मुख्य सूत्रधार आहे. त्यामुळे त्याची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

United Nations: इस्रायलच्या समर्थनार्थ पहिल्यांदाच UN बैठक, अमेरिकेने दिला पूर्ण पाठिंबा; इस्त्रायली लष्कर राफाह शहरात घुसले!

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

SCROLL FOR NEXT