Sidhu Moose Wala
Sidhu Moose WalaDainik Gomantak

सिद्धू मुसेवाला हत्याकांड: गँगस्टर गोल्डी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी

सिद्धू मुसेवाला हत्याकांडात गँगस्टर गोल्डी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.
Published on

सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी गुरुवारी मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंटरपोलने या प्रकरणातील आरोपी गोल्डी ब्रारविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. तो कॅनडामध्ये राहतो. त्याचबरोबर या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. 29 मे रोजी झालेल्या सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी पोलीस सातत्याने तपास करत आहेत.

दुसरीकडे, सीबीआयने गुरुवारी पंजाब पोलिसांच्या दाव्याच्या विरुद्ध विधान जारी करत म्हटले की, पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर 30 मे रोजी गोल्डी ब्रार विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती प्राप्त झाली होती. कॅनडात राहणारा सतींद्रजित सिंग उर्फ गोल्डी ब्रार याने मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात 29 मे रोजी मुसेवालाची हत्या करण्यात आली होती.

Sidhu Moose Wala
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई 'मास्टरमाईंड'

पंजाब पोलिसांनी बुधवारी दावा केला की, आम्ही मुसेवालाच्या हत्येच्या 10 दिवस आधी गोल्डी ब्रार विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती केली होती, त्यानंतर सीबीआयने आपली भूमिका मांडली आहे.

Sidhu Moose Wala
सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचे गूढ उकलण्यासाठी एसआयटीची पुनर्रचना

पंजाब पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचे आवाहन केले होते

पंजाब पोलिसांनी बुधवारी दावा केला की, आम्ही मुसेवालाच्या हत्येच्या 10 दिवस आधी गोल्डी ब्रार विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सीबीआयने आपली भूमिका मांडली आहे. दुसरीकडे, सीबीआयने (CBI) म्हटले की, पंजाब पोलिसांच्या ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडून आम्हाला 30 मे रोजी दुपारी 12:25 वाजता ईमेलद्वारे विनंती प्राप्त झाली होती. फरीदकोटमधील नगर पोलिस ठाण्यात ब्रारच्या विरोधात नोंदवलेल्या दोन एफआयआरच्या आधारे पंजाब (Punjab) पोलिसांना रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती करणारे पत्र 19 मे रोजी ईमेलशी जोडले गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com