देश

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अटकेचे वृत्त चुकीचे : दिल्ली पोलीस

फेक न्यूज (Fake News) पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील पोलिसांनी (Delhi Police) सांगितले.

दैनिक गोमन्तक

भारतीय किसान युनियनचे नेते आणि शेतकरी आंदोलनातील प्रमुख चेहरा असलेल्या राकेश टिकैत यांना अटक झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याची माहीती दिल्ली पोलिसांनी शनिवारी दिली. तसेच अशा पद्धतीने फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.

राकेश टिकैत यांच्या अटकेबद्दल वृत्त निराधार असून अशा पद्धतीची चुकीची माहीती पसरवणाऱ्या बातम्या आणि ट्विट विरोधात कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त प्रियांका कश्यप यांनी सांगितले. “टिकैत यांना अटक झाली नसून ते गाझीपूर य़ेथील आंदोलन स्थळीच आहेत. तसेच त्याठिकाणी कुठलीही कारवाई झाली नाही” असे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते धर्मेंद्र मलिक यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाला 7 महिनेपुर्ण झाले, मात्र अजुनही शतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्याच चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या तरीही शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण झाल्या नाही. त्यामुळे आंदोलक शेतकऱयांनी वेगवेगळ्या राज्यांत असणाऱ्या राजभवनांना घेराव घालुन राज्यपालांना निवेदन देणार असल्याची घोषणा केल्यानंतर दिल्ली पोलीसांनी शनिवारी दिल्लीच्या सीमावर्ती भागातील सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT