आंदोलनकर्ते शेतकरी घालणार राजभवन आणि राष्ट्रपती भवनाला घेराव

दिल्लीच्या सीमेवरील शेतकर्‍यांच्या निषेध आंदोलनाला आज सात महिने पूर्ण झाले आहेत. दिल्ली आणि हरियाणा दरम्यानच्या सिंघू सीमेवर शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन सुरू केलं होत
Farmer Protest
Farmer ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्ली सीमेवर मागील सात महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे शेतकरी आज देशभरातील राजभवनांना घेराव घालून राज्यपाल व राष्ट्रपतींना आपल्या मागण्यांचे निवेदन देणार आहेत. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवर धरणे आंदोलनाला आज ७ महिने पूर्ण झाले आहेत .तरीही ते आंदोलन आजपर्यंत सुरूच आहे. केंद्र सरकार जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तो पर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचं वारंवार आंदोलनकडून सांगितले जात आहे. अशातच सरकार मागण्या पूर्ण करत नसल्यामुळे सीमेववर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना आज देशभरातील राजभवनांना घेराव घालून राज्यपाल व राष्ट्रपतींना आपल्या मागण्यांचे निवेदन देणार आहेत. तसेच या आंदोलनात दिल्ली-गाझियाबाद सीमेवर यूपी गेटवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्चही निघणार आहे.

दिल्लीच्या सीमेवरील शेतकर्‍यांच्या निषेध आंदोलनाला आज सात महिने पूर्ण झाले आहेत. दिल्ली आणि हरियाणा दरम्यानच्या सिंघू सीमेवर शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन सुरू केलं होत . तसेच दिल्लीच्या आणखी दोन सीमेवही आंदोलन सुरू होत.

Farmer Protest
कोणत्याही परिस्थितीसाठी तयार रहा; वायुदल प्रमुखांचे सुरक्षा यंत्रणांना आदेश

यावेळी भारतीय किसान संघाचे प्रवक्ते म्हणाले, गाझीपूर सीमेवर शेतकरी पुन्हा मोठ्या संख्येने आपली शक्ती दाखवत आहेत. मागील तीन नोव्हेंबरपासून तीन केंद्रीय कायदे रद्द करावे या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. 26 जून रोजी शेतकर्‍यांचे प्रतिनिधी विविध राज्यांच्या राज्यपालांना निवेदन देतील आणि आपली मागण्या मांडतील.

दरम्यान हे कायदे रद्द व्हावे तसेच आपल्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते आणि सरकार यांच्यामध्ये अनेकवेळा चर्चा झाली आहे पण तरीही यात काहीही समाधान भेटलं नाही. मात्र २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी दिल्लीत जो ट्रॅक्टर मोर्चा काढला त्याला हिंसक वळण मिळाल आणि सरकार व शेतकरी संघटनेमधील चर्चा थांबली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com