Delhi Metro Dainik Gomantak
देश

मेट्रोमध्ये अल्पवयीन मुलीसमोर घाणेरडे कृत्य करणारा गजाआड, संतप्त प्रवाशांनी पकडून...

Delhi Crime: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील मेट्रोमध्ये एक लाजीरवाणी घटना घडली आहे.

Manish Jadhav

Delhi Crime: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील मेट्रोमध्ये एक लाजीरवाणी घटना घडली आहे. ही घटना पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले लोकही अवाक झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या आत एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीसमोर घाणेरडे काम करायला सुरुवात केली. नंतर लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य

दरम्यान, घटना दिल्ली मेट्रोच्या रेड लाईनची आहे. बुधवारी रक्षाबंधन सण होता. सणासुदीचा दिवस असल्याने मेट्रोला गर्दी होती. मेट्रोच्या बोगीतून सर्व वयोगटातील लोक प्रवास करत होते. सर्व लोक कुटुंबासह प्रवास करत होते.

त्यानंतर एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीजवळ अचानक हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलीच्या आईने त्या व्यक्तीचे हे घृणास्पद कृत्य पाहिल्यानंतर ती घाबरली. त्यानंतर आई आणि मुलगी दोघी पूर्व दिल्लीतील (Delhi) सीलमपूर स्टेशनवर उतरल्या.

प्रवाशांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले

दुसरीकडे, मेट्रोमध्ये अल्पवयीन मुलीसमोर अश्लिल कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या शेजारी फिरणाऱ्या लोकांनी त्याचे सर्व गैरकृत्य जवळून पाहिले होते.

तिथे उपस्थित लोकांनी मुलीसमोर हस्तमैथुन करणाऱ्या व्यक्तीला लगेच पकडून शाहदरा स्थानकावर मेट्रो अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, ती व्यक्ती पश्चिम बंगालमधून दिल्लीत आली होती. पोलिस (Police) येईपर्यंत मेट्रो अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला खोलीत बसवून ठेवले होते.

नंतर पोलीस तिथे पोहोचल्यावर त्याच्या या हिंस्र कृत्याची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून आपल्यासोबत नेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT