Delhi High Court Dainik Gomantak
देश

बाटला हाऊस एनकाउंटर प्रकरणातील आरोपी अरिज खानच्या फाशीला स्थगिती, दिल्ली HC निर्णय

Batla House Encounter Case: बाटला हाऊस एनकाउंटर प्रकरणातील दोषी अरिज खानला फाशीची शिक्षा होणार नाही.

Manish Jadhav

Batla House Encounter Case: बाटला हाऊस एनकाउंटर प्रकरणातील दोषी अरिज खानला फाशीची शिक्षा होणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने दोषी अरिज खानच्या फाशीच्या शिक्षेची पुष्टी करण्यास नकार दिला आहे.

न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. याप्रकरणी दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. 18 ऑगस्ट रोजी दिल्ली पोलीस आणि आरोपींचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

दरम्यान, या चकमकीत दिल्लीचे पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा शहीद झाले होते. सुनावणीदरम्यान, दहशतवादी (Terrorist) अरिज खानच्या वकिलाने फाशीच्या शिक्षेला विरोध करत असा युक्तिवाद केला की, त्यांचा अशिल अरीज खान सुधारला जाऊ शकत नाही आणि सुधारणेला वाव नसला तरीही जन्मठेपेची शिक्षा देण्याचा नियम आहे.

2021 मध्ये दोषी आढळला, त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली

दिल्ली पोलिसांची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील राजेश महाजन यांनी युक्तिवाद केला की, वर्दीधारी पोलिस अधिकाऱ्याची हत्या ही दुर्मिळ प्रकरणांपैकी दुर्मिळ घटना आहे. अशा परिस्थितीत दोषीला फाशीची शिक्षा द्यायला हवी.

अरिजचा मानसशास्त्रीय विश्लेषण अहवाल न्यायालयात सादर करताना, खानचे तुरुंगातील वर्तन असमाधानकारक असल्याचे सांगण्यात आले होते.

साकेत न्यायालयाने 8 मार्च 2021 रोजी अरिज खानला दोषी ठरवले होते आणि 15 मार्च 2021 रोजी त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर फाशीच्या शिक्षेची पुष्टी करण्यासाठी हा खटला दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित होता. आता न्यायालयाने दहशतवादी अरिज खानला फाशीची शिक्षा दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

काय आहे बाटला हाऊस एनकाउंटर प्रकरण?

दिल्लीतील साखळी बॉम्बस्फोटांनंतर 19 सप्टेंबर 2008 रोजी दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने दिल्लीतील जामिया भागातील बाटला हाऊसवर छापा टाकला होता. तिथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मा शहीद झाले.

हत्येनंतर इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित अरिज खान घटनास्थळावरुन फरार झाला होता. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2018 रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अरिजला अटक केली होती.

अरिज खान आणि त्याच्या साथीदारांनी एका पोलिसाचा जीव घेतला होता

साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी या खटल्याची सुनावणी करताना म्हटले होते की, फिर्यादीने सादर केलेल्या पुराव्यांवरुन हा खटला सिद्ध झाला आहे.

अरिज खान आणि त्याच्या साथीदारांनी पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली. पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला हे रीतसर सिद्ध झाले आहे.

दुसरीकडे, अरिज खानला दोषी ठरवताना न्यायालयाने त्याला 11 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता आणि दंडाच्या रकमेपैकी 10 लाख रुपये शर्माच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले होते. तसेच मृत पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाला सरकारने वाढीव भरपाई देण्याची शिफारसही करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कृषीमंत्री रवी नाईक यांच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसागर, सायंकाळी होणार अंत्यविधी

Horoscope: 'या' 3 राशींसाठी आजचा दिवस खास! मोठी बातमी मिळणार; आर्थिक घडी बसणार

Goa Politics: 'म्हजे घरचे स्वरूप लोकांना खरी मदत करणारे नाही'! CM सावंत, कार्लोस फेरेरा एकाच मंचावर; नास्नोड्यात अर्ज वितरित

Goa Politics: ‘माझे घर’ हा सरकारचा निवडणूक स्टंट, लोकांची फसवणूक करण्याचे षडयंत्र! अमित पाटकरांचे टीकास्त्र

Dowry Case: 2 लाखांच्या हुंड्यासाठी केला मानसिक, शारीरिक छळ; महिलेची तक्रार; 12 वर्षांनंतर पतीसह 5 आरोपी निर्दोष

SCROLL FOR NEXT