Delhi High Court मध्ये तीन नवीन न्यायाधीशांनी पदाची घेतली शपथ

नवीन नियुक्तीमुळे दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 47 वर पोहोचली आहे.
Delhi High Court
Delhi High CourtDainik Gomantak

दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) गुरुवारी तीन नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ देण्यात आली आहे, तर त्यांची संख्या आता 47 वर गेली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश विपिन सांघी यांनी पुरुषेंद्र कुमार कौरव, अनिश दयाल आणि अमित शर्मा या तीन नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली आहे. नवीन नियुक्तीमुळे दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 47 वर पोहोचली आहे. (Three new judges sworn in in Delhi High Court)

Delhi High Court
गँगस्टर बिश्नोईला आणण्यासाठी पंजाब पोलीस दिल्लीला रवाना; उच्च न्यायालयात आज सुनावणी

याआधी, 18 मे 2022 रोजी दिल्ली उच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांनी पदाची शपथ घेतली होती. तसेच न्यायमूर्ती कौरव यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयातून दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्यात आली. अमित शर्मा यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. अधिवक्ता अनिश दयाल आणि अमित शर्मा यांच्या नावांची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नोव्हेंबर 2021 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती.

न्यायमूर्ती कुआरव यांच्या नियुक्तीची अधिसूचना 1 जून 2022 रोजी जारी केली होती. तर केंद्र सरकारने (Central Government) 31 मे 2022 रोजी नियुक्तीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com