Delhi High Court: गँगरेप पीडिता 27 आठवड्यांची गरोदर, कोर्टाने दिली गर्भपाताची परवानगी; जाणून घ्या प्रकरण

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सामूहिक बलात्कार पीडितेची 27 आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्यास परवानगी दिली.
Delhi High Court
Delhi High CourtDainik Gomantak

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सामूहिक बलात्कार पीडितेची 27 आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्यास परवानगी दिली आहे.

पीडित मुलगी नेपाळमधील अल्पवयीन असून ती 27 आठवड्यांची गर्भवती आहे. लोकनायक जय प्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डच्या मते, वैद्यकीयदृष्ट्या गर्भधारणा संपुष्टात आणली जाऊ शकते. अशी माहिती मिळाल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.

आईच्या याचिकेवर आदेश आला

न्यायालयाचा आदेश पीडितेच्या आईच्या याचिकेवर आला आहे, ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, ऑक्टोबर 2022 मध्ये मुलीचे पालक दिल्लीत (Delhi) काम करत असताना त्यांच्या मुलीवर नेपाळमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. याचिकेत आईने मुलीची गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी मागितली होती.

Delhi High Court
Delhi High Court: पतीपासून वेगळे झाल्यानंतरही पत्नीला सासरी राहण्याचा अधिकार

न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह म्हणाल्या की, "पीडित मुलगी आणि कुटुंब हे नेपाळचे नागरिक आहेत हे लक्षात घेऊन, हे न्यायालय एलएनजेपी रुग्णालयातील डॉक्टरांना लवकरात लवकर गर्भधारणा संपुष्टात आणण्याचे निर्देश देते."

Delhi High Court
Delhi High Court मध्ये तीन नवीन न्यायाधीशांनी पदाची घेतली शपथ

न्यायालयाकडून सांगण्यात आले की, 'मुलीला मार्चमध्ये तिच्या आई-वडिलांसोबत भारतात (India) आल्यावर तिच्या गरोदरपणाची माहिती मिळाली,

मात्र तिने गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तोपर्यंत गर्भधारणा 25 आठवड्यांहून अधिक झाली होती. तर गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी केवळ 24 आठवड्यांपर्यंत आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com