Facebook-whatsapp Dainik Gomantak
देश

Delhi HC: व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकला धक्का, CCI चौकशी विरोधातील याचिका फेटाळली

व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे.

दैनिक गोमन्तक

व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन गोपनीयता धोरणाबाबत CCI म्हणजेच भारतीय स्पर्धा आयोगाची चौकशी सुरूच राहील, असे न्यायालाने सांगितले आहे.

उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने सीसीआयच्या तपासाविरोधात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा अर्ज फेटाळून लावला आहे. यापूर्वी एकल खंडपीठानेही दोघांची याचिका फेटाळून लावली होती. त्याविरोधात व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकने उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठासमोर अर्ज केला होता.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सीसीआयने व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन गोपनीयता धोरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते, ज्याला व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकने विरोध केला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच, दिल्ली उच्च न्यायालयाने सोशल मीडिया कंपन्यांच्या आयटी नियमांना आव्हान देणाऱ्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपने दाखल केलेल्या याचिकांवर केंद्र सरकारकडून उत्तर मागितले होते.

नवीन नियमानुसार मेसेजिंग अ‍ॅपने कोणाला मेसेज सुरू केला आहे हे शोधणे आवश्यक आहे. नवीन नियम गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करतात आणि घटनाबाह्य आहेत या कारणास्तव याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले होते. आता हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठात प्रलंबित असून न्यायालयाने तपासाविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे.

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपने याचिकेत म्हटले होते की, सरकार किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार भारतातील संदेशाचा जनक ओळखण्याचा प्रयत्न केल्याने "एंड-टू-एंड एन्क्रिप्शन" आणि त्याचे फायदे धोक्यात येतात. संदेशाचा शोध लावणाऱ्याची तरतूद घटनाबाह्य आणि गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

Goa Education: 3 वर्षांपासून निधीअभावी अडचणीत असलेल्या 'बाल हक्क आयोगा'ला अखेर सरकारी अनुदान; 'गोमन्तक'च्या वृत्ताची प्रशासनाकडून तातडीने दखल

SCROLL FOR NEXT