Satyendra Jain Dainik Gomantak
देश

Satyendra Jain: दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर, उपचारासाठी SC चा दिलासा

Aam Aadmi Party: आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Satyendra Jain: आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उपचारासाठी हा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना 6 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. यादरम्यान, त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेता येणार आहे.

दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयाने सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना दिल्ली सोडता येणार नाही. न्यायालयाचा हा आदेश 11 जुलैपर्यंत लागू राहणार आहे.

10 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, जे उपचार केले जातील, त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा असेही न्यायालयाने जामीन मंजूर करताना सूचित केले आहे.

गुरुवारी सकाळी बाथरुममध्ये घसरले

गेल्या एक वर्षापासून तिहार तुरुंगात बंद असलेल्या जैन यांना अशक्तपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जेलच्या बाथरुममध्ये ते घसरुन पडले होते.

यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती तपासली असता ते ठिक ठाक असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले होते. मात्र, जैन यांनी डॉक्टरांना पाय, पाठ आणि खांदे दुखत असल्याचे सांगितले. यानंतर त्यांना दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले

त्यानंतर, सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एलएनजेपी रुग्णालयात रेफर करण्यात आले. जिथे त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांना स्लिप डिस्कमुळे खूप वेदना होत आहेत.

सत्येंद्र जैन गेल्या एक वर्षापासून तुरुंगात आहेत

दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने गेल्या वर्षी 30 मे 2022 रोजी अटक केली होती. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांना अटक करण्यात आली.

त्यांच्यावर फेब्रुवारी 2014 ते मे 2017 या कालावधीत वेगवेगळ्या नावे वेगवेगळ्या मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी सत्येंद्र जैन यांनी 15 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी न्यायालयाला (Court) जामीन देण्याची विनंती केली. मात्र, त्या अर्जावर न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Karnataka Water Dispute: गोमंतकीयांचा पाण्याचा हक्क धोक्यात? म्हादईनंतर आता तिळारीवर नजर; गोव्याच्या पाण्यावर कर्नाटकच्या नव्या दाव्याची चाहूल

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी अफवांवर दिलं स्पष्ट उत्तर; 'हिटमॅन'बाबतचा संभ्रम दूर

Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

SCROLL FOR NEXT