Former Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia Dainik Gomantak
देश

Manish Sisodia यांना मोठा झटका, विशेष CBI न्यायालयाने जामीन फेटाळला; हायकोर्टात मागणार दाद

Delhi Excise Policy: शुक्रवारी राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

Manish Jadhav

Delhi Excise Policy: दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात बंद असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. शुक्रवारी राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

दरम्यान, सिसोदिया सध्या 5 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. सिसोदिया आता कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात अपील करणार आहेत.

त्यांना सीबीआयने (CBI) 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सीबीआयसोबतच ते अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या तपासालाही सामोरे जात आहेत.

सिसोदिया म्हणाले होते- कोठडीत ठेवल्याने उद्देश साध्य होणार नाही

न्यायालयाने गेल्या आठवड्यात 24 मार्च रोजी जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला होता. आपल्याला कोठडीत ठेवण्याचा उद्देश साध्य होणार नाही, असे म्हणत सिसोदिया यांनी ट्रायल कोर्टात जामीन मागितला होता.

कारण या प्रकरणातील सर्व जप्ती यापूर्वीच झालेल्या आहेत. कथित अबकारी धोरण घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींना जामीन मिळाल्याचेही त्यांनी सांगितले होते. ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. समाजात त्यांची एक ओळख आहे.

तसेच, सीबीआयतर्फे वकील डीपी सिंग यांनी जामिनाला विरोध केला. सिसोदिया यांना जामीन मिळाल्यास ते तपासावर प्रभाव टाकू शकतात, असा युक्तिवाद त्यांनी केला. कारण त्यांनी दिल्ली सरकारमध्ये अत्यंत प्रभावशाली पद भूषवले आहे.

सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती

मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार ते 5 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात सिसोदिया यांची चौकशी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुपारी गँगस्टर तिला गोळी घालू शकतो! पूजा नाईकला सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी; कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात मंत्र्याचा हात??

Saiyami Kher: 'आरोग्य चांगले नसेल, तर पैसा असून काहीच फायदा नसतो'! Ironman 70.3 स्पर्धेची सदिच्छादूत अभिनेत्री 'सैयामी'चे प्रतिपादन

"हांव जीव सोडपाक तयार", गोव्यातील 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला; नेमके घडले काय? Watch Video

Tamarind Tree: राम, सीता, लक्ष्मण वनवासात गेल्यावर प्रथम जिथे झोपडी बांधून राहिले असा, गुणधर्माने देवपण लाभलेला 'चिंच वृक्ष'

Konkani Drama Competition: वृद्धांच्या व्यथा मांडणारी उत्कृष्ट कलाकृती, 'बापू-गांधी'

SCROLL FOR NEXT