Manish Sisodia यांना कोर्टाचा दणका, मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी कोठडी आणखी 5 दिवसांनी वाढवली

Money Laundering Case: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा न्यायालयाकडून झटका बसला आहे.
Manish Sisodia
Manish Sisodia Dainik Gomantak
Published on
Updated on

Money Laundering Case: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा न्यायालयाकडून झटका बसला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात शुक्रवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने त्यांच्या ईडी कोठडीत आणखी 5 दिवसांची वाढ केली आहे. हे प्रकरण GNCTD च्या उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमधील कथित अनियमिततेशी संबंधित आहे.

तथापि, न्यायालयाने मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना त्यांच्या कुटुंबाचा खर्च आणि पत्नीच्या वैद्यकीय खर्चासाठी अनुक्रमे 40,000 आणि 45,000 रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली.

Manish Sisodia
Manish Sisodia यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल, भ्रष्टाचाराचा 'हा' नवा आरोप

दरम्यान, सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिसोदियांना ईडीने अटक केली. यापूर्वी न्यायालयाने सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 21 मार्चपर्यंत पुढे ढकलली होती. सीबीआय (CBI) अबकारी धोरणाचाही तपास करत आहे.

Manish Sisodia
Manish Sisodia यांच्यावर CBI नंतर ED ची कारवाई, 8.30 तासांच्या चौकशीनंतर अटक

आज न्यायालयात हजर

मागील सुनावणीदरम्यान राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष सीबीआय न्यायाधीश एम के नागपाल यांनी सिसोदिया यांना 17 मार्च रोजी दुपारी 2 वाजता न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. सुनावणीदरम्यान, ईडीने त्यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आणि सांगितले की, त्यांचा आणि काही इतरांचा सामना करण्याची आवश्यकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com