delhi corona new case death reports today active cases positivity rate  Dainik Gomantak
देश

दिल्लीत 24 तासांत कोरोनाचे 141 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

गोव्यात 4 जणांना कोरोनाची लागण

दैनिक गोमन्तक

देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे (corona) 141 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासोबतच एका कोरोना रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीत (Delhi) कोरोनाचे 608 सक्रिय रुग्ण आहेत. त्याच वेळी, कोरोना दर 1.29% आहे.

दरम्यान, गोव्यात आज दिवसभरात 488 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 4 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. आजचा पॉझिटिव्हिटी दर 0.081% इतका आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. गोव्यात आजचा रिकव्हरी दर 98.43% असून 17 सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात 14 कोरोनातून बरे झाले आहेत.

दरम्यान, सातत्याने रुग्णसंख्या कमी असल्याने राज्य लवकरच 'मास्क फ्री' करणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण जी कोरोना रुग्णसंख्या एकेकाळी 3000च्या घरात होती ती रुग्णसंख्या सध्या 10च्या आत असल्याने गोवेकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT