Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Delhi CM Arvind Kejriwal: दिल्ली पोलीसांनी केजरीवालांच्या घरी दिली दस्तक, कोणत्या प्रकरणात नोटीस बजावली?

Delhi Police: दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले.

Manish Jadhav

Delhi CM Arvind Kejriwal: दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या हॉर्स ट्रेडिंगच्या आरोपाप्रकरणी क्राइम ब्रँचचे एसीपी केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. त्यांचे 21 आमदार फोडण्याची योजना असल्याचे केजरीवाल म्हणाले होते. विशेष म्हणजे, यासंदर्भात त्यांच्या सात आमदारांशी संपर्क साधण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केला होता की, ''भाजप आम आदमी पार्टीच्या आमदारांना 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे. त्यांचे सात आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. योग्य वेळ आल्यावर ऑडिओ क्लिप रिलीज करु.''

आम आदमी पार्टीच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

दरम्यान, दिल्ली भाजपने हे आरोप फेटाळून लावले असून आम आदमी पक्षाला भाजपने कथितरित्या संपर्क केलेल्या आमदारांची नावे उघड करण्यास सांगितले आहे. एवढ्यावरच न थांबता दिल्ली भाजपचे सचिव हरीश खुराना यांनी आतिशी यांना भाजपने संपर्क केलेल्या आमदारांची नावे उघड करण्याचे आव्हान दिले आहे. भाजपचे म्हणणे आहे की, केजरीवालांचा पक्ष असे बेताल आरोप करुन महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे.

दारु घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना ईडीचे पाचवे समन्स

दारु घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना पाचव्यांदा चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. यापूर्वी, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीने पाठवलेल्या समन्सला सूडाची कारवाई असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, यापूर्वी ईडीने 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी केजरीवालांना समन्स पाठवले होते, परंतु ते हजर झाले नाहीत. ईडीने सातत्याने समन्स जारी केल्यानंतर आम आदमी पक्षाने दावा केला होता की, ही सर्व प्रक्रिया अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी केली जात आहे. ईडी त्यांना चौकशीच्या बहाण्याने बोलावून अटक करु इच्छित आहे. आपचे म्हणणे आहे की, जर ईडीला चौकशी करायची असेल तर ते आपले प्रश्न लिहून केजरीवाल यांना देऊ शकतात.

ईडीच्या समन्सवर केजरीवाल काय म्हणाले?

ईडीला पाठवलेल्या पत्रात केजरीवाल यांनी म्हटले होते की, ते प्रत्येक कायदेशीर समन्स स्वीकारण्यास तयार आहेत, परंतु हे ईडी समन्स देखील पूर्वीच्या समन्सप्रमाणेच बेकायदेशीर आहे. ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत त्यांनी ते मागे घेण्याची मागणी केली होती. यापूर्वी, केजरीवाल म्हणाले होते की, मी माझे आयुष्य प्रामाणिकपणे जगत आहे. माझ्याकडे लपवण्यासारखे काही नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT