Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांची उच्च न्यायालयात धाव! आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी कारवाईला दिले आव्हान...

2017मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेवेळी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आले होते.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalDainik Gomantak

Arvind Kejriwal Case in Mapusa Court: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हापसा न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 2017मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेवेळी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आले होते.

Arvind Kejriwal
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा-पणजीतील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या किमती

संपूर्ण माहिती अशी की, म्हापसा न्यायालयात केजरीवाल यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या या कारवाईला त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले.

याबाबत 5 जानेवारीला केजरीवाल यांना म्हापसा न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र त्यांनी हजर राहण्यास सूट मागितली. ते 26 जानेवारीला दिल्लीतील राष्ट्रीय कार्यक्रमाच्या कामात आणि राज्यसभेच्या उमेदवारीच्या तयारीत व्यस्त असल्याचा दावा त्यांचे वकील ॲड. सुरेल तिळवे यांनी केला होता. केजरीवाल यांना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये याप्रकरणी समन्स बजावण्यात आले होते.

2017 मधील विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी पैसे घेण्याबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. सर्वांकडून पैसे घ्या मात्र मतदान आप पक्षाला मतदान करा, असे ते त्यावेळी म्हणाले होते. या वक्तव्याची दखल घेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. त्यांच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार हे प्रकरण न्यायालयात गेले आणि आता केजरीवाल यांना याप्रकरणी समन्स जारी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com