Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना ईडीचे तिसरे समन्स, 3 जानेवारीला चौकशीसाठी बोलावले

Delhi Chief Minister Arvind Kejriwal: दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांना 3 जानेवारीला हजर राहण्यास सांगितले आहे.
Mapusa Court Summons Arvind Kejriwal
Mapusa Court Summons Arvind KejriwalDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Chief Minister Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी तिसरे समन्स पाठवले आहे. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांना 3 जानेवारीला हजर राहण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री केजरीवाल विपश्यनेसाठी पंजाबच्या होशियारपूरमध्ये आहेत. इथे मुख्यमंत्री 10 दिवस राहणार आहेत.

यापूर्वी, ईडीने 19 डिसेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना समन्स पाठवले होते आणि 21 डिसेंबर रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, केजरीवाल 10 दिवसांची सुट्टी घेऊन 20 डिसेंबरला चौकशीच्या एक दिवस आधी विपश्यनेसाठी गेले. तर ईडीने यापूर्वी 30 ऑक्टोबर रोजी मद्य धोरण प्रकरणी चौकशीसाठी पहिले समन्स पाठवले होते आणि अरविंद केजरीवाल यांना 2 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते, मात्र केजरीवाल हजर राहू शकले नाहीत.

Mapusa Court Summons Arvind Kejriwal
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना 5 जानेवारीला म्हापसा कोर्टात हजर राहण्याचे निर्देश

मुख्यमंत्री केजरीवाल पंजाबच्या होशियारपूरमध्ये विपश्यनेसाठी गेले

दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल विपश्यनेसाठी पंजाबमधील होशियारपूर इथे पोहोचले असून ते इथे 10 दिवस ध्यानधारणा करणार आहेत. यापूर्वी केजरीवाल यांना 21 डिसेंबरला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गेल्या बुधवारी विपश्यनेसाठी गेले. होशियारपूरच्या महिलावली गावात असलेल्या धम्मध्वज विपश्यना साधना केंद्रात ते 10 दिवस ध्यानधारणा करतील. आधीच नियोजित विपश्यना कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री 30 डिसेंबरपर्यंत उपस्थित राहणार आहेत. याच कारणामुळे ते 21 डिसेंबरला ईडीसमोर हजर झाले नाहीत. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना 21 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com