court Dainik Gomantak
देश

Bihar Crime: बिहारमध्ये दोन न्यायाधीशांवर हल्ला, शिवीगाळ करत गळा दाबण्याचा केला प्रयत्न

Bihar Crime: सासाराम दिवाणी न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांवर मंगळवारी रात्री काही लोकांनी हल्ला केला. शिवीगाळ करुन मारहाण केली.

Manish Jadhav

Bihar Crime: सासाराम दिवाणी न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांवर मंगळवारी रात्री काही लोकांनी हल्ला केला. शिवीगाळ करुन मारहाण केली.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना वाचवले. दुसरीकडे, माहिती मिळताच शहर पोलिसांनी आरोपींना अटक केली, मात्र त्यांच्यासोबत असलेल्या अन्य गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी पोलिसांवर लाठीहल्ला करुन त्यांची सुटका केली.

दरम्यान, माहिती मिळताच पोलीसही मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ कारवाई करत बेडा येथील पेट्रोल पंपाचे मालक रमाकांत सिंग आणि सारी संसार कापड दुकानाचा मालक शंतनू या दोन आरोपींना (Accused) अटक केली.

त्यानंतर, बुधवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कम उप न्यायाधीश -5 रामचंद्र प्रसाद यांनी मुफसिल पोलिस (Police) ठाण्यात या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

तसेच, मंगळवारी रात्री 7.30 वाजता अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कम सब न्यायाधीश-5 रामचंद्र प्रसाद आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कम सब न्यायाधीश-4 देवेश कुमार कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर पोहोचले होते.

वाटेत बेडा कालवा ओलांडल्यावर काही सामान घेण्यासाठी गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला उभी केली. यादरम्यान दुचाकीवरुन येणाऱ्या रमाकांत आणि शंतनूने न्यायाधीशांच्या कारला धडक दिली. यामुळे कारचे नुकसान झाले.

यापूर्वीही न्यायिक अधिकाऱ्याशी भांडण झाले होते

एफआयआरनुसार, आरोपींनी यापूर्वीही येथील न्यायदंडाधिकारी यांना मारहाण केली होती. मारहाणीदरम्यान, आरोपीने सांगितले की, आम्ही यापूर्वीही न्यायाधीशांना मारहाण केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळीला उतरती कळा, 'मोपा'ची भरारी! प्रवासी संख्येत 34 टक्क्यांची वाढ; जुन्या विमानतळावर मात्र 13 टक्क्यांची घट

Goa Theft Case: 'मी विसर्जनासाठी मदत करतो' म्हणत बाप्पा हातात घेतला अन् पोबारा; म्हापशात चांदीच्या दागिन्यांसह गणेशमूर्तीची चोरी

US Iran War: मध्यपूर्वेतील 7 महिन्यांचा थरार संपणार? ट्रम्प म्हणाले, 'अमेरिका-इराण युद्ध अंतिम टप्प्यात!' रक्तरंजित संघर्षानंतर अखेर टेबल टॉक्स सुरु?

EPFO Wage Limit: 'ईपीएफओ'चा मोठा निर्णय! वेतनमर्यादा 13 हजारांवरून थेट 25 हजार; 51 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा

Budhaditya Yog 2026: बुधादित्य अन् भद्र राजयोगाचा दुहेरी धमाका! रातोरात पालटणार 5 राशींचं नशीब; गुंतवणुकीतून मिळणार कोट्यवधींचा परतावा

SCROLL FOR NEXT