Bihar: लालू प्रसाद यांच्या पार्टीतील बड्या नेत्याचे अपहरण, बदमाशांनी घराबाहेर बोलावले...

Bihar News: मिळालेल्या माहितीनुसार, सुनील राय यांचे मंगळवारी पहाटे अपहरण करण्यात आले. आरोपी स्कॉर्पिओ कारमधून आल्याचे सांगण्यात येत आहे.
Bihar Police
Bihar PoliceDainik Gomantak

Bihar Crime News: बिहारमधील छपरा येथे राजद नेत्याचे अपहरण करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील राय यांचे मंगळवारी पहाटे अपहरण करण्यात आले. आरोपी स्कॉर्पिओ कारमधून आल्याचे सांगण्यात येत आहे.

सुनील राय यांच्या वडिलांनी मीडिया रिपोर्ट्सला सांगितले की, मंगळवारी सकाळी कोणीतरी फोन करुन त्यांच्या मुलाला बाहेर बोलावले. त्यांनी पुढे सांगितले की, सुनील घराजवळील त्याच्या कार्यालयाजवळ (Offices) पोहोचला तेव्हा पांढऱ्या स्कॉर्पिओमधून आलेल्या बदमाशांनी त्याला जबरदस्तीने ओढले आणि गाडीत बसवून घटनास्थळावरुन पळ काढला.

Bihar Police
Bihar Politics: प्रशांत किशोर म्हणाले, "महात्मा गांधींना दारुबंदी कधीच नको होती"

दरम्यान, ही संपूर्ण घटना पहाटे 4.35 च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना (Police) या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि तपासात गुंतले.

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुमारे 5 ते 6 गुन्हेगार आले आणि त्यांनी सुनील कुमार यांना जबरदस्तीने ओढून स्कॉर्पिओमध्ये बसवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

Bihar Police
Atal Bihar Vajpayee: 'अटलबिहारी वाजपेयी ब्रिटिशांचे गुप्तहेर होते...', काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

सुनील रायच्या वडिलांनी कोणाशीही शत्रुत्व असल्याचा इन्कार केला आहे

सुनील राय यांच्या वडिलांनी आपल्या मुलाचे कोणाशीही वैर असल्याचं नाकारले. जरी त्यांनी सांगितले की, असे दिसते की ज्याने सकाळी फोन केला तो माझ्या मुलाला ओळखत होता. विशेष म्हणजे, माझा मुलगा त्याला भेटण्यासाठी बाहेर गेला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com