Viral Video Dainik Gomantak
देश

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

Dangerous Bike Stunt Video: आजच्या सोशल मीडियाच्या युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाताना दिसतात.

Manish Jadhav

Dangerous Bike Stunt Video: आजच्या सोशल मीडियाच्या युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाताना दिसतात. जगात स्टंट करणाऱ्यांची कमतरता नाही, पण काही स्टंटबाज असे जीवघेणे पराक्रम करतात की ते पाहून सामान्य माणसाच्या अंगावर काटा येतो. अनेकदा या स्टंटबाजीच्या नादात रस्ते अपघातांच्या भीषण घटना घडतात, ज्यात निष्पाप लोकांचा बळी जातो. स्टंट करणाऱ्यांना स्वतःच्या जिवाची पर्वा नसतेच, पण त्यांच्या अशा वागण्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्या इतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येतो.

सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही तरुण हायवेवर एका मोठ्या ट्रकच्या पाठीमागे अत्यंत धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवताना दिसत आहेत. सुदैवाने या घटनेत कोणताही अपघात झाला नाही, मात्र हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी या स्टंटबाजांना चांगलेच धारेवर धरले आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एका गजबजलेल्या हायवेवर पुढे एक मोठा ट्रक वेगाने धावत आहे. या ट्रकच्या अगदी पाठीमागे एक तरुण आपली बाईक वेड्यावाकड्या पद्धतीने, ज्याला 'लहरिया कट' म्हटले जाते, चालवत आहे. ट्रक आणि दुचाकीमधील अंतर इतके कमी आहे की, जर ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला असता, तर दुचाकीस्वाराला स्वतःला सावरण्याची थोडीही संधी मिळाली नसती.

अशा परिस्थितीत दुचाकी थेट ट्रकच्या खाली जाऊन मोठा अनर्थ ओढवू शकला असता. मात्र, त्या तरुणाला आपल्या जिवाची अजिबात भीती वाटत नसल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे जाणवते. धक्कादायक बाब म्हणजे, तो तरुण एकटाच नव्हता, त्याच्यासोबत आणि त्याच्या पाठीमागे आणखी तीन दुचाकीस्वार देखील त्याच पद्धतीने स्टंट करण्यात मग्न होते. रस्त्यावरील नियमांची पायमल्ली करत हे तरुण मृत्यूला आमंत्रण देत होते.

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर @1VaishaliMishra नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला दिलेले कॅप्शन सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, "रस्ते अपघातात दुचाकीस्वार मुलाचा मृत्यू झाला तर पोलीस ट्रक ड्रायव्हरला जेलमध्ये पाठवतात, पण यावेळी ड्रायव्हरने स्वतः व्हिडिओ रेकॉर्ड केला." ही टिप्पणी अत्यंत मार्मिक आहे, कारण अनेकदा रस्ते अपघातांमध्ये मोठ्या वाहनांच्या चालकांनाच जबाबदार धरले जाते, मग चूक कोणाचीही असो.

या व्हिडिओमध्ये मात्र ट्रक चालकाने दाखवलेली सतर्कता आणि रेकॉर्ड केलेले पुरावे हे सिद्ध करतात की, अनेकदा अपघातांना कारणीभूत ही स्टंटबाज मुलेच असतात. अवघ्या 11 सेकंदांच्या या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली असून आतापर्यंत 58 हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रियांचा पूर आला आहे. एका युजरने संताप व्यक्त करताना म्हटले की, "अशाच कृत्यांमुळे ही मुले ट्रकच्या खाली चिरडलेली आढळतात आणि मग लोक ट्रक ड्रायव्हरला दोष देतात." दुसऱ्या एका युजरने या मुलांना 'पृथ्वीवरील ओझं' संबोधले. बहुतांश लोकांनी अशा स्टंटबाजांवर कडक पोलीस कारवाई करण्याची मागणी केली.

लोकांचे म्हणणे आहे की, केवळ दंड आकारुन ही मुले सुधारणार नाहीत, तर त्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले पाहिजेत. हायवेवर अशा प्रकारे गाड्या चालवणे हे केवळ स्वतःसाठीच नाही, तर इतरांसाठीही जीवघेणे ठरु शकते, याचे भान या तरुणांना नसल्याचे पाहून सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.

रस्त्यावर स्टंटबाजी करणे हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य आहे, हे या तरुणांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. रस्ते सुरक्षा नियम हे सर्वांच्या कल्याणासाठी बनवलेले असतात. वेग आणि साहसाची आवड असणे गैर नाही, पण त्यासाठी योग्य जागा आणि सुरक्षा साधनांचा वापर करणे आवश्यक असते.

सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारे वागणे म्हणजे मृत्यूला थेट साद घालण्यासारखे आहे. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे की, ते घराबाहेर पडल्यावर रस्ते नियमांचे पालन करतात की नाही. शेवटी, घरी तुमची कोणीतरी वाट पाहत असते, याची जाणीव प्रत्येक वाहनचालकाने ठेवायला हवी. या व्हायरल व्हिडिओने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला असून प्रशासनाने अशा स्टंटबाजांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

'पर्यटनाला ओव्हर-रेग्युलेशनचा फटका!' फुकेटच्या तुलनेत गोव्यातील हॉटेल्स दुप्पट महाग; अमिताभ कांतांचे Tweet Viral

Viral Video: व्हिडिओ गेमसाठी 2 वर्षे स्वतःला खोलीत कोंडून घेतलं, दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून उडाला थरकाप; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल!

SCROLL FOR NEXT