Dalai Lama  Dainik Gomantak
देश

Dalai Lama: दलाई लामा आरोग्य तपासणीसाठी एम्समध्ये दाखल, Admit केल्याचे वृत्त फेटाळले

Dalai Lama News: तिबेटी बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांची रविवारी दिल्लीतील एम्समध्ये नियमित आरोग्य तपासणी करण्यात आली.

Manish Jadhav

Dalai Lama News: तिबेटी बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांची रविवारी दिल्लीतील एम्समध्ये नियमित आरोग्य तपासणी करण्यात आली. मात्र दलाई लामा यांना ऍडमिट केल्याचे वृत्त ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने (एम्स) फेटाळले आहे. दलाई लामा यांना ऍडमिट केल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, दलाई लामा यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले, त्यांना ‘कार्डिओ-न्यूरो सेंटर’च्या खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. कार्डिओलॉजीचे प्राध्यापक डॉ. राजीव नारंग यांच्या ते देखरेखीखाली असल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, एम्सने या वृत्ताचे स्पष्ट खंडन केले.

दरम्यान, 2 ते 4 ऑक्टोबर या कालावधीत ते तैवानच्या अनुयायांच्या विनंतीवरुन मॅक्लॉडगंज येथील मुख्य बौद्ध मंदिरात तीन दिवस प्रवचन देणार होते, परंतु सर्दी आणि खोकल्यामुळे त्यांनी पहिले दोन दिवस प्रवचन दिले नाही. यादरम्यान त्यांनी निवासस्थानी विश्रांती घेतली. 4 ऑक्टोबर रोजी त्यांनी तैवानच्या अनुयायांना आणि इतर बौद्ध अनुयायांना प्रवचन दिले. हलक्या थंडीचा त्रास झाल्यानंतर, लामा यांना तज्ञ डॉक्टरांनी एम्समध्ये आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला दिला होता.

दलाई लामा यांनी पाच दिवसांचा सिक्कीम दौरा पुढे ढकलला

सिक्कीममधील पूर आणि मदतकार्य लक्षात घेता दलाई लामा यांचा 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यानचा पाच दिवसांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. या संदर्भात दलाई लामा यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'पुरामुळे सिक्कीममधील परिस्थिती सामान्य नाहीये. राज्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सध्या मदतकार्यात गुंतलेली आहे. अशा परिस्थिती पाहता धर्मगुरुंनी आपला सिक्कीम दौरा पुढे ढकलला आहे.' सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळे अनेकांचा जीव गेला असून अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT