Court Dainik Gomantak
देश

'नवरा-बायकोमधील रोजची किरकिर म्हणजे क्रूरता नव्हे' हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Kolkata High Court: IPC च्या कलम 323 अतंर्गत गुन्हा सिद्ध करत 1000 रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा दिली होती.

दैनिक गोमन्तक

Kolkata High Court: पती पत्नीमधील रोजचे भांडण सामान्य समजले जाते. आता यावर कलकत्ता उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. अशा एका प्रकरणावर सुनावणी करताना पती पत्नीमधील दररोजच्या भांडणाला क्रूरता म्हणता येणार नाही, असे म्हटले आहे.

  • काय आहे प्रकरण?

एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध मानसिक आणि शारिरिक छळ केल्याची फिर्याद दाखल केली होती. तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी तिच्याकडे 50000 रुपये हुंड्याची मागणी केली होती.

मात्र ही मागणी, ती पूर्ण करु शकली नाही. त्यामुळे तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार तिने दाखल केली होती. आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तिने म्हटले होते.

  • हायकोर्टाने का रद्द केली 498 A अंतर्गत शिक्षा?

हे प्रकरण ट्रायल कोर्टपासून हायकोर्टापर्यंत पोहचले. मात्र हायकोर्टाचे न्यायाधीश सुगातो मजूमदार यांनी आरोपीची शिक्षा कमी केली आहे. मात्र IPC च्या कलम 323 अतंर्गत गुन्हा सिद्ध करत 1000 रुपयांचा दंड भरण्याची ट्रायल कोर्टने दिलेली शिक्षा कायम ठेवली आहे.

सेशन कोर्टाने 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि IPC च्या कलम 323 अतंर्गत गुन्हा सिद्ध करत 1000 रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा दिली होती.

पुढे कलकत्ता हायकोर्टाने असेही म्हटले आहे की, IPC चे 498A कलमातंर्गत येणारी क्रूरता आणि नवरा-बायकोमधील रोजचे भांडण यामध्ये फरक आहे.

महत्वाचे म्हणजे, हायकोर्टाने असेही म्हटले आहे की, सेशन कोर्टा( Court )ने असेही म्हटले आहे की, सेशन कोर्टाने या प्रकरणात निर्णय देताना चूक केली आहे. सादर केलेले पुरावे योग्यप्रकारे तपासले गेले नाहीत. त्यामुळे सेशन कोर्टाने IPC मधील कलम 498 A अंतर्गत आरोपीला दिलेली शिक्षा हायकोर्टाने कमी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: पाटकर, सरदेसाईंमुळे तुटली युती; 'आरजी'ला संपविण्यासाठीच 'मास्टर प्लान', मनोज परब यांचा आरोप

Goa Road Accident: अतिवेगामुळे राज्‍यात दरमहा सरासरी 19 जणांचा मृत्‍यू! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची राज्‍यसभेत माहिती

खून प्रकरणात जन्मठेप भोगणारे तिघे ठरले निर्दोष, सत्र न्‍यायालयाचा निर्णय खंडपीठाने बदलला

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना झटका; अंतरिम जामीन नाकारला, दिल्लीच्या राेहिणी न्यायालयाचा निर्णय

Goa Nightclub Fire: प्रसंगी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांवरही होईल कारवाई, क्‍लबमधील आगीनंतर कडक पावले

SCROLL FOR NEXT