'पत्नीला सूड उगवायचा आहे,' सुप्रीम कोर्टाने रद्द केला सासरच्यांविरोधातील खटला

लग्नाच्या वेळी दीराने तिच्या आई-वडिलांकडे कार आणि 2 लाख रुपये रोख मागितले होते. तिच्या लग्नात दीर अशी मागणी का करेल हे समजण्यापलीकडचे आहे.
Supreme Court |Cruelty and Dowry |Wife
Supreme Court |Cruelty and Dowry |WifeDainik Gomantak

'Wife wants revenge', Supreme Court quashes case of cruelty and dowry against in-laws:

सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका महिलेची, सासरच्यांविरुद्धचा हुंड्यासाठी छळ केल्याचा फौजदारी खटला रद्द केला.

न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, पीव्ही संजय कुमार आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने सांगितले की, हुंड्यासाठी छळ केल्याचे महिलेचे आरोप आश्चर्यकारक आणि अशक्य आहेत. या आरोपांवरुन असे दिसते की, महिलेला "तिच्या सासरच्यांविरुद्ध सूड घ्यायचा होता."

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले आहे की, "हे आरोप इतके आश्चर्यकारक, अनाकलनीय आणि अशक्य आहेत की, आरोपींविरुद्ध कारवाई करण्यासाठी हे आरोप आणि पुरावे पुरेसे नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत फौजदारी कारवाई सुरू ठेवण्याची गरज नाही. अपीलकर्त्यांविरुद्ध जर कारवाई करण्याची परवानगी दिली तर तो स्पष्टपणे अन्याय होईल."

Supreme Court |Cruelty and Dowry |Wife
'घर जावई' होण्यास जबरदस्ती करणे म्हणजे क्रूरता, हायकोर्टाचा निर्वाळा

सर्व आरोप आश्चर्यकारक

आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलेने असा आरोप केला की, तिच्या लग्नाच्या वेळी दीराने तिच्या आई-वडिलांकडे कार आणि 2 लाख रुपये रोख मागितले होते. तिच्या लग्नात दीर अशी मागणी का करेल हे समजण्यापलीकडचे आहे. असे खंडपीठाने सांगितले.

या महिलेने अशीही तक्रार केली होती की, तिच्या सासूने तिला एकदा मॅक्सी घातल्यामुळे टोमणे मारले होते. यावर खंडपीठाने म्हटले आहे की, कायद्यातील तरतुदीनुसार हा छळ होत नाही.

या महिलेने उच्च न्यायालयात दीराविरुद्ध एक वाईट तक्रार दाखल केली होती, ज्यावरून तिला स्पष्टपणे तिच्या सासरच्या लोकांकडून बदला घ्यायचा होता, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. (Supreme Court)

Supreme Court |Cruelty and Dowry |Wife
पतीचे स्वतःच्या आईशी संबंध असल्याचा आरोप करणे क्रूरता; हाय कोर्टाचे निरीक्षण

घर सोडल्यानंतर चार वर्षांनी एफआयआर

न्यायालयाने नमूद केले की, महिलेने कबूल केले आहे की ती 2009 मध्ये तिच्या सासरच्या घरापासून विभक्त झाली होती, परंतु 2013 पर्यंत तिने तिच्या सासरच्या विरोधात तक्रार दाखल केली नाही. मात्र, तिच्या पतीने घटस्फोटाची कार्यवाही सुरू केल्यानंतर तिने एफआयआर दाखल केला.

न्यायालयाने, (Supreme Court) महिलेचे हे आरोप कायद्याच्या दृष्टीने क्रूरतेसाठी अत्यंत अपुरे असल्याचे सांगितले. त्यामुळे सासरच्यांविरुद्ध फौजदारी तक्रार आणि कार्यवाही रद्द करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com