DA Hike Latest Update Dainik Gomantak
देश

DA Hike: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! DA मध्ये 3% वाढीची शक्यता; तुमच्या खात्यात किती वाढीव पगार येणार?

DA Hike Latest Update: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत (DA) सकारात्मक संकेत मिळत आहेत.

Sameer Amunekar

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत (DA) सकारात्मक संकेत मिळत आहेत. कामगार विभागाने (लेबर ब्युरो) जाहीर केलेल्या अखिल भारतीय औद्योगिक कामगार ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (AICPI-IW) ताज्या आकडेवारीनुसार, मे 2026 मध्ये निर्देशांक 150.8 या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे यंदाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाई भत्त्यात 3 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. मात्र, अंतिम निर्णय जून 2026 च्या AICPI-IW आकडेवारीनंतर आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच होणार आहे.

जूनच्या आकडेवारीवर अंतिम निर्णय अवलंबून

यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ जाहीर केली होती. आता मे महिन्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार आणखी 3 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र जून महिन्याचा निर्देशांक जाहीर झाल्यानंतरच महागाई भत्त्याचा अंतिम दर निश्चित केला जाणार आहे.

यानंतर वित्त मंत्रालय प्रस्ताव तयार करेल आणि पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे.

DA कसा ठरवला जातो?

महागाई भत्त्याची गणना AICPI-IW च्या मागील 12 महिन्यांच्या सरासरीवर आधारित केली जाते. यासाठी निर्देशांकाच्या सरासरीचा विशिष्ट सूत्रानुसार विचार केला जातो. 2016 या आधार वर्षाची तुलना 2001 च्या आधार वर्षाशी करण्यासाठी 2.88 हा गुणांक (Multiplier) वापरला जातो. याच सूत्राच्या आधारे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा DA निश्चित करते.

मे 2026 पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार महागाई भत्ता सुमारे 63.13 टक्क्यांच्या पातळीपर्यंत पोहोचण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील वाढीची शक्यता अधिक मजबूत मानली जात आहे.

पगारात किती वाढ होऊ शकते?

जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन (Basic Pay) 40,000 रुपये असेल, तर महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ झाल्यास त्याच्या मासिक उत्पन्नात थेट वाढ होईल.

उदाहरणार्थ, 3 टक्के DA वाढ झाल्यास अशा कर्मचाऱ्याच्या मासिक वेतनात सुमारे 1,200 रुपयांची वाढ होऊ शकते. अर्थात, प्रत्यक्ष वाढ संबंधित कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनानुसार वेगवेगळी असेल.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकते घोषणा

सध्या लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक जून 2026 च्या AICPI-IW आकडेवारीची प्रतीक्षा करत आहेत. ती जाहीर झाल्यानंतर सरकारकडून पुढील प्रक्रिया सुरू होईल. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2026 मध्ये महागाई भत्त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, 8 व्या वेतन आयोगाबाबतही कर्मचारी वर्गाच्या अपेक्षा कायम आहेत, मात्र सध्या चर्चेचा केंद्रबिंदू महागाई भत्त्यातील संभाव्य 3 टक्के वाढ हा आहे. सरकारच्या अंतिम निर्णयाकडे आता लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT