Goa Education: शिक्षक, कर्मचाऱ्यांना आता डिजिटल हजेरी अनिवार्य; पारदर्शक प्रक्रियेला प्राधान्‍य, ई-गव्हर्नन्सअंतर्गत 'समर्थ-एक्स' प्रणालीला प्रारंभ

Samarth X Attendance: १८ जूनपासून प्रायोगिक तत्त्वावर या प्रणालीच्या माध्यमातून हजेरी नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.
Samarth X Attendance
Goa EducationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयांतील (इयत्ता बारावीपर्यंतच्या) सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आता केंद्र सरकारने तयार केलेल्या ‘समर्थ-एक्स’ या डिजिटल हजेरी प्रणालीतून नोंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

१८ जूनपासून प्रायोगिक तत्त्वावर या प्रणालीच्या माध्यमातून हजेरी नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. ही प्रणाली कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर येत्या ३० दिवसांत डिजिटल हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे. राज्यात या उपक्रमाची अंमलबजावणी गोवा राज्य समर्थ ई-गव्हर्नन्स प्रकल्प कक्षामार्फत करण्यात येत आहे.

Samarth X Attendance
School Committee: फोंडा हेडगेवार विद्यालयात पालक-शिक्षक संघाची निवड

या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती, रिअल-टाईम नोंद आणि पारदर्शकतेला प्राधान्य मिळेल. मुख्याध्यापक तसेच शिक्षण खात्याला केंद्रीकृत डिजिटल डॅश-बोर्डद्वारे त्वरित उपस्थितीची माहिती उपलब्ध होईल.

ही प्रणाली विद्या समीक्षा केंद्र तसेच इतर राष्ट्रीय डिजिटल प्रणालीं शी जोडली जाणार आहे पूर्व-प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणापर्यंत एकसंध डिजिटल शिक्षण परिसंस्था निर्माण करण्याचा उद्देश. राज्यभरातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अत्यंत उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद

Samarth X Attendance
Goa Government Schools: शाळा वाढल्या पण बाकडी रिकामी! 6 वर्षांत 49 सरकारी शाळा बंद, तर विनाअनुदानित शाळांमध्ये ८ ने वाढ!

‘समर्थ-एक्स’ केवळ उपस्थिती नोंदविण्यापुरते मर्यादित नसून, संपूर्ण शालेय शिक्षण व्यवस्था एकाच डिजिटल व्यासपीठावर आणणारा शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे शाळांमधील प्रशासन अधिक पारदर्शक होईल.

- डॉ. महादेव गावस,

संचालक (गोवा राज्य समर्थ ई-गव्हर्नन्स प्रकल्प)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com