DA Hike Latest Update Dainik Gomantak
देश

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्ता 63 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता; 1 जुलैपासून मिळणार वाढीव भत्ता?

DA Hike Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याबाबत (DA) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Sameer Amunekar

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याबाबत (DA) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै ते डिसेंबर 2026 या कालावधीसाठी केंद्र सरकार महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही वाढ झाल्यास सध्या 60 टक्के असलेला DA थेट 63 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. विशेष म्हणजे, या वाढीचा आर्थिक लाभ 1 जुलै 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा केंद्र सरकारकडून होणे बाकी आहे.

DA वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार फायदा

महागाई भत्त्यातील प्रस्तावित वाढीचा फायदा केंद्र सरकारच्या मोठ्या संख्येने कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना होऊ शकतो. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60 टक्के दराने DA मिळत आहे. जर सरकारने 3 टक्के वाढ मंजूर केली, तर हा दर 63 टक्क्यांवर जाईल.

DA हा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर आधारित असल्यामुळे त्यात वाढ झाल्यास दरमहा मिळणाऱ्या एकूण पगारातही फरक पडतो. त्याचप्रमाणे निवृत्तीवेतनधारकांसाठी Dearness Relief (DR) मध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

महागाईच्या आकडेवारीवर ठरणार DA

केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्याचा आढावा घेते. साधारणपणे जानेवारी आणि जुलै या दोन कालावधींसाठी DA मध्ये बदल केला जातो. हा निर्णय महागाईच्या स्थितीशी संबंधित AICPI-IW म्हणजेच All India Consumer Price Index for Industrial Workers या निर्देशांकाच्या आकडेवारीवर आधारित असतो.

जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या DA सुधारण्यासाठी जुलै 2025 ते जून 2026 या कालावधीतील आकडेवारी महत्त्वाची ठरते. या काळातील महागाईच्या ट्रेंडनुसार DA वाढीचा अंदाज निश्चित केला जातो.

जूनच्या आकडेवारीनंतर 3 टक्के वाढीचा अंदाज

जून 2026 च्या AICPI-IW आकडेवारीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. जूनमध्ये निर्देशांक 151.9 अंकांवर पोहोचला. उपलब्ध आकडेवारीच्या आधारे 12 महिन्यांच्या सरासरीचा विचार केल्यानंतर सातव्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार DAचा आकडा 63 टक्क्यांच्या आसपास येत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यामुळे केंद्र सरकारकडून DA मध्ये 3 टक्के वाढ होण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. मात्र, गणिती अंदाज आणि सरकारचा अंतिम निर्णय यात फरक असू शकतो. त्यामुळे अधिकृत अधिसूचना जारी होईपर्यंत कर्मचाऱ्यांनी ही वाढ निश्चित मानू नये.

1 जुलैपासून वाढ लागू होण्याची शक्यता

DA मध्ये वाढ करण्याचा निर्णय काही महिन्यांनी जाहीर झाला तरी त्याची प्रभावी तारीख पूर्वलक्षी असते. म्हणजेच सरकारने जुलै ते डिसेंबर 2026 या कालावधीसाठी 3 टक्के वाढ मंजूर केली तर तिची अंमलबजावणी 1 जुलै 2026 पासून होऊ शकते.

यामुळे कर्मचाऱ्यांना जाहीर झाल्यानंतर मागील महिन्यांची थकबाकी अर्थात एरियर मिळण्याची शक्यता असते. मात्र एरियरची नेमकी पद्धत आणि देय तारीख सरकारच्या अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होईल.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घोषणेची शक्यता

महागाई भत्त्यातील वाढीची अधिकृत घोषणा अनेकदा सणासुदीच्या काळात केली जाते. त्यामुळे यंदाच्या जुलै-डिसेंबर 2026 कालावधीतील DA वाढीची घोषणा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

2026 मध्ये दिवाळी 8 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे त्याआधी केंद्र सरकार DA वाढीची घोषणा करणार का, याकडे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सचे लक्ष लागले आहे.

याआधी 2 टक्के वाढ झाली होती

याआधी केंद्र सरकारने 2026 मध्ये महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर DA 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत पोहोचला. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली होती.

आता पुढील सुधारण्यात 3 टक्के वाढ झाली तर DA 63 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना सरकारच्या अंतिम घोषणेची प्रतीक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT