Remal Cyclone Alert:  Dainik Gomantak
देश

Remal Cyclone Alert: बंगालमध्ये वादळाचा धोका! ‘या’ दिवशी धडकणार रेमल चक्रीवादळ; आयएमडीने जारी केला अलर्ट

Remal Cyclone Alert: 26 मे रोजी पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता आहे.

Manish Jadhav

Remal Cyclone Alert: सध्या रेमल चक्रीवादळाच्या संदर्भात चर्चा सुरु आहे. 26 मे रोजी पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने गुरुवारी याबाबतची माहिती दिली होती. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा आणि पूर्व मिदनापूर जिल्ह्यांतील किनारपट्टीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल तर काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रविवारी सायंकाळपर्यंत हे वादळ बांगलादेश (Bangladesh) आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर तीव्र चक्रीवादळाच्या रुपात धडकेल, असे हवामान विभागाने सांगितले. हवामान विभागाने मच्छिमारांना रविवारपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरात न जाण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, 'रेमल' चक्रीवादळाच्या आगमनाबाबत सोशल मीडियावर (Social Media) अनेक पोस्ट करण्यात आल्या होत्या. अलीपूर हवामान विभागाने सांगितले की, उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशात समुद्रसपाटीपासून सुमारे सात किलोमीटर उंचीवर कमी दाब तयार झाला असून तो बंगालच्या उपसागरावर ईशान्येकडे सरकत आहे. काल दक्षिण-पश्चिम आणि लगतच्या भागात तयार झालेला कमी दाब ईशान्येकडे सरकला, असे हवामान विभागाने सांगितले.

ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहणार

या काळात बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये 80 ते 100 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. बंगालच्या उपसागरात विकसित होणारे हे वादळ 25 मे रोजी डीप डिप्रेशनमध्ये रुपांतरित होईल आणि 26 मे रोजी सकाळी चक्री वादळात रुपांतरित होईल.

मुसळधार पावसाचा इशारा!

या जिल्ह्यांमध्ये 25 तारखेपासून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू लागेल आणि 26 तारखेला वाऱ्याचा वेग 80 ते 100 किलोमीटरच्या दरम्यान राहील. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोलकाता, हावडा, नादिया आणि झारग्राम जिल्ह्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 26 तारखेला बांगलादेशात लॅंडफॉल झाल्यानंतरही, पश्चिम बंगालमध्ये 27 तारखेपर्यंत जोरदार पाऊस आणि जोरदार वारे सुरुच राहतील.

'मोचा' चक्रीवादळ गेल्या वर्षी बंगालच्या उपसागरात धडकले होते

प्री-मॉन्सून आणि मान्सूनच्या काळात हिंदी महासागरात वादळे निर्माण होतात. यावर्षी, मान्सूनपूर्व काळात म्हणजे एप्रिल ते जून दरम्यान वादळ येण्याची शक्यता कमी होती. मात्र, यंदा पावसाळ्यात जोरदार वादळे येणार आहेत. गेल्या वर्षी 2023 मध्ये बंगालच्या उपसागरावर 'मोचा' हे अत्यंत तीव्र चक्रीवादळ आले होते. प्रदीर्घ सागरी प्रवासानंतर, वादळ म्यानमारच्या दिशेने सरकले आणि 14 मे 2023 रोजी सितवे जवळील किनारपट्टी धडकले होते.

रेमल हे वर्षातील पहिले मान्सूनपूर्व वादळ!

यावेळेस एप्रिल महिन्यात वादळ आले नसून या वर्षीचे पहिले मान्सूनपूर्व वादळ मे महिन्यात येत आहे. तथापि, मान्सूनपूर्व वादळे एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात जास्त वेळा येतात आणि त्यांची संख्या अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरात जास्त असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT