Crime News Dainik Gomantak
देश

Crime News: मित्रांकडून तरुणाचा निर्घृण खून, नारळ विक्रीच्या पैशावरून वाद; दोन संशयित अटकेत

ainapur kagwad murder case over money dispute: ऐनापूर (ता. कागवाड) येथे नारळ विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या वाटपावरून झालेल्या वादातून मित्रांनीच एकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

शिरगुप्पी: ऐनापूर (ता. कागवाड) येथे नारळ विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या वाटपावरून झालेल्या वादातून मित्रांनीच एकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कागवाड पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

संतोष सिद्धप्पा कमते (वय ३३, रा. ऐनापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी संतोषने आपल्या दोन मित्रांसह शेतातील झाडांवरून नारळ काढले. त्यानंतर हे नारळ ऐनापूरमधील एका दुकानात विक्रीस ठेवून त्यातून काही रक्कम मिळवली.

या पैशातून तिघांनी मद्यपान केले. नशेत घरी परतताना उरलेल्या पैशांच्या वाटपावरून तिघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. संतापाच्या भरात आणि नशेच्या प्रभावाखाली असलेल्या दोघा मित्रांनी संतोषला बेदम मारहाण केली.

मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाल्यानंतरही संशयित थांबले नाहीत. त्यांनी जवळच असलेल्या मोठ्या दगडाने संतोषच्या डोक्यावर प्रहार करून त्याचा जागीच खून करून घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच अथणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत मुन्नोळी, सीपीआय संतोष हल्लूर, पीएसआय राघवेंद्र खोत व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच संशयितांना जेरबंद केले. बाहुबली

भोगसे (वय २८) व श्रीशैल मडिवाळर (३१, दोघेही रा. ऐनापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

या घटनेमुळे ऐनापूर परिसरात खळबळ उडाली असून, मद्यपानामुळे मैत्रीचाच बळी गेला’ अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मृत संतोषच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कागवाड पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT