Cow Hug Day Dainik Gomantak
देश

Valentine's Day: 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करण्याचे आवाहन मागे, मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर निर्णय

Cow Hug Day: देशाच्या पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारी रोजी 'काउ हग डे' साजरा करण्याचे आवाहन मागे घेतले आहे.

Manish Jadhav

Cow Hug Day on Valentine's Day: देशाच्या पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारी रोजी 'काउ हग डे' साजरा करण्याचे आवाहन मागे घेतले आहे. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याऐवजी 'काऊ हग डे' साजरा करावा म्हणजेच गायींना आलिंगन द्यावे, असे आवाहन मंडळाने केले होते.

दरम्यान, शासनाच्या आदेशानंतर मंडळाने आपले अपील मागे घेतले आहे. जगभरात आणि विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.

मात्र, भारतातील (India) काही धार्मिक आणि सांस्कृतिक संघटना याला विरोध करत आहेत. इतकेच नव्हे तर 14 फेब्रुवारीला आणखी काही दिवस साजरे करण्याचे आवाहनही अनेक संघटनांकडून करण्यात येत आहे.

दुसरीकडे, एखाद्या सरकारी संस्थेने असे आवाहन करण्याची ही पहिलीच वेळ होती. यावरुन वाद सुरु झाला. सोशल मीडियावरही लोक विविध मीम्स तयार करुन या आदेशाची खिल्ली उडवत होते. याच दबावामुळे मंडळाने आपले अपील मागे घेतल्याचे मानले जात आहे.

अपील मागे घेतल्याची माहिती बोर्डाचे सचिव एस.के.दत्ता यांनी दिली आहे. त्यांनी नोटीस जारी करुन म्हटले आहे की, 'दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्रालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन, पशुसंवर्धन विभागाने काउ हग डे साजरा करण्याचे आवाहन मागे घेत आहे.'

तसेच, प्रथमच असे आवाहन अ‍ॅनिमल वेलफेयर बोर्डकडून करण्यात आले. जगभरातील माध्यमांमध्ये त्याची चर्चा झाली. या चर्चेनंतरच मंत्रालयाने मंडळाला हग डे साजरा करण्याचे आवाहन मागे घेण्याचे आदेश दिल्याचे मानले जाते.

असे आवाहनही विरोधी पक्षनेत्यांनी केले. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) म्हणाले होते की, 'हग डे' ऐवजी 'स्पर्श दिवस' असे नाव द्यावे. सर्व वादानंतरच सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यानंतर अपील मागे घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT