Delta Variant Dainik Gomantak
देश

Delta Variant मुळे भारतात कोरोना वेगाने पसरला- INSACOG

भारतात कोविड -19 संसर्गाचा प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे डेल्टा व्हेरिएंट, आणि राज्यांना जाणवत असणारा लसींचा तुटवडा.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत अधिकच भर पडत चालली असतानाच भारतीय सार्स सीओव्ही 2 जीनोमिक कन्सोर्टियम (INSACOG) या सरकारी प्रयोगशाळेतील एका टीम ने म्हटले की, भारतात कोविड -19 संसर्गाचा प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे डेल्टा व्हेरिएंट, आणि राज्यांना जाणवत असणारा लसींचा तुटवडा.

INSACOG ने 16 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळे नागरिकांना येणारे गंभीर आजारपण आणि मृत्यू टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरले असले तरी, संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाय आणि लसीकरण महत्वाचे आहे. ते पुढे म्हणाले की, भारतात संक्रमणाच्या केसेसमध्ये डेल्टा फॉर्मच्या अधिक केसेस वाढत आहेत. आतापर्यंत देशात डेल्टा प्लस प्रकारांचे 61 नमुने सापडले आहेत.

ते म्हणाले, 'डेल्टा फॉर्म ही सध्या भारतात चिंतेचा विषय बनत आहे. भारतातील संसर्गाची प्रकरणे डेल्टाचं स्वरुप, असुरक्षित लोकसंख्या, संसर्ग रोखण्यासाठी लसीची कमी प्रभावीता आणि संक्रमणाची शक्यता हे सगळ यास कारणीभूत ठरु शकते. मे महिन्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली.

देशात सक्रिय रुग्णांची संख्या 3.63 लाखावर

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 3,63,605 एवढी आहे जी मागील 150 दिवसातील सर्वात कमी आहे. तसेच संक्रमणाच्या एकूण प्रकरणांमध्ये 1.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जे मार्च 2020 नंतरची सर्वात कमी आकडेवारी आहे. देशात आतापर्यंत कोविड -19 लसींचे 57 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

INSACOG ने पुढे म्हटले की, भारतात लसीकरण झालेल्या लोकांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे पुन्हा एकदा आढळूण येत आहेत. यासंबंधी त्यांनी ब्रिटनचे उदाहरणही दिले. सुमारे 6.7 करोड लोकसंख्या असलेल्या ब्रिटनमध्ये सुमारे 1.8 दशलक्ष रुग्णांची नोंद झाली आहे. एप्रिल 2021 पासून लसीकरण झालेल्या 1.2 लाख लोकांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळूण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT