भारतात 18 वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणासाठी कोणकोणत्या लसी वापरल्या जाताय?

What are the vaccines used in India for immunization of youth above 18 years of age?
What are the vaccines used in India for immunization of youth above 18 years of age?
Published on
Updated on

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती गंभीर होत जाताना दिसते आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबत मृत्यूचे प्रमाण देखील वाढताना दिसते आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोना लस आशेचा किरण ठरते आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कोरोना लस हा एकमेव पर्याय आपल्यासमोर असल्याचे दिसते आहे. त्यामुळे सध्या देशभरात कोरोना लसीकरणाचे कार्यक्रम राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून आयोजित केले जाता आहेत.  त्यातच आता केंद्र सरकारने 18 वर्षांवरील युवकांसाठी देखील कुरण लसीचे लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. (What are the vaccines used in India for immunization of youth above 18 years of age)

जवळपास प्रत्येक राज्यात 18 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लसीचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. तर या लसीकरणामध्ये कोणकोणत्या लसींचा समावेश असेल हे जाणून घेऊयात

१) कोविशील्ड 
कोरोना लसीकरणात मुख्यतः कोविशील्डनुकत्याच  या लसीचा समावेश होतो. ऑक्सफर्डच्या एस्ट्रोझेनकाच्या या लसीचे भारताच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाते आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सिरम इन्स्टिट्यूटने राज्य सरकारला ही लस कमी किमतीत देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार राज्यांना प्रत्येकी 300 रुपयांना ही लस मिळणार आहे. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि बिहार सारख्या काही राज्यांनी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान केंद्र सरकारसाठी 150 रुपये राज्य सरकरांसाठी 300 रुपये तर खुल्या बाजारात विक्रीसाठी 600 रुपये अशी कोविशील्डची किंमत असल्याचे समजते आहे.  

२) कोवॅक्सीन 
भारतात दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या लसीचे नाव कोवॅक्सीन असून ही लस पूर्णपणे भारतात तयार केली गेली आहे. हैदराबादमधील भारत बायोटेक लिमिटेड कंपनीने या लसीची निर्मिती केली आहे. देशातील वेगवगेळ्या राज्यांसाठी कोवॅक्सीन लसीची किंमत 600 रुपये असून खुल्या बाजारात या लसीची  किंमत 1200 रुपये एवढी असणार आहे. भारत बायोटेकने निर्णयासाठी  या लसीची किंमत 15 ते 20 डॉलर पर्यंत निश्चित केली आहे. तर केंद्र सरकारला ही लस देखील 150 रुपये प्रति डोस याप्रमाणे मिळणार आहे. 

३) स्पुटनिक व्ही                                                                                सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड (Covishield) आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सनीनंतर (Covaccine) केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही (Sputnik V) लसीला देखील मान्यता दिली आहे. रशियाने ही लस पाठवण्यास सुरुवात केली असल्याचे समजते आहे. रशियाकडून मे महिन्यात दोन ते तीन करोड लसींचा पुरवठा केला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातो आहे. दरम्यान स्पुटनिक व्ही लस देखील दोन टप्प्यात किंवा दोन डोस घ्यावे लागणार आहे. त्यानुसार पहिला डोस घेतल्यानंतर तीन ते चार आठवड्याच्या अंतराने दुसरा डोस देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितनुसार ही लस 91 टक्के यशस्वी असल्याचे समजते आहे. भारतात स्पुटनिक व्ही लसीची विक्री डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी कडून केली जाणार आहे. 

अजुन तीन लसी देखील लवकरच येणार

या तीन लसींव्यतिरिक्त जॉन्सन अँड जॉन्सन ची लस देखील लवकरच भारतात दाखल होणार असल्याचे समजते आहे. दरम्यान भारतामध्ये या लसीच्या ट्रायलसाठी ड्रग कंट्रोलर जनलरल ऑफ इंडियाकडे परवानगी मागितली असल्याची माहिती देखील जॉन्सन अँड जॉन्सनकडून 20 एप्रिल रोजी देण्यात आली आहे. तर फायझर (Pfizer) आणि मॉडर्ना(Moderna) नामक इतर दोन लसीदेखील भारताला वर्षअखेर पर्यंत मिळणार असल्याचे समजते आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com