PM Modi Dainik Gomantak
देश

Video: ''पीएम मोदी राक्षस आहेत, सर्वांना गिळून टाकतील...''; जेडीयू पक्षाच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

MLA Gopal Mandal Comment On PM Modi: अनेकदा लोक बोलण्यापूर्वी विचार करत नाहीत की ते काय बोलत आहेत आणि कोणाबद्दल बोलत आहेत?

Manish Jadhav

MLA Gopal Mandal Comment On PM Modi: अनेकदा लोक बोलण्यापूर्वी विचार करत नाहीत की ते काय बोलत आहेत आणि कोणाबद्दल बोलत आहेत? विशेषतः राजकारणी लोक अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करुन राजकीय गोंधळ निर्माण करतात. असाच काहीसा प्रकार बिहारचे आमदार गोपाल मंडल यांच्याबाबत घडला आहे. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बोलताना त्यांचा संयम एवढा ढळला की, आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलत आहोत हे ते विसरले.

दरम्यान, बिहारमधील भागलपूरच्या गोपालपूर विधानसभा मतदारसंघातील जेडीयूचे स्पष्टवक्ते आमदार गोपाल मंडल यांनी पंतप्रधान मोदींना राक्षस म्हटले. मंडल म्हणाले की, ''आम्ही पीएम मोदींच्या विरोधात नाही. मात्र ते राक्षस आहेत. एक दिवस ते सर्वांना गिळून करुन ढेकर देतील. ते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे नाहीत.'' ते पुढे म्हणाले की, 'आजपर्यंत मी पीएम मोदींचे नाव ऐकले नाही, हे मोदी कोण आहेत?' दुसरीकडे मात्र आमदार मंडल यांच्या वक्तव्याने भाजपचे नेते चांगलेच संतापले आहेत.

नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा

भाजपचा पराभव करायचा असेल तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवणे अत्यंत गरजेचे असल्याचे गोपाल मंडल म्हणाले. नितीशकुमार यांना केवळ संयोजक बनवून चालणार नाही. त्यांना पंतप्रधानपदाचे दावेदार बनवून I.N.D.I.A. आघाडी भाजपशी टक्कर देऊ शकेल. देशातील प्रत्येक मूल नितीशकुमारांना ओळखते. त्यांनी देशभर फिरुन सर्व लहान-मोठ्या नेत्यांना एकत्र केले. ते आजपर्यंत वादात अडकलेले नाहीत, असेही ते पुढे म्हणाले.

राहुल गांधी हे अभ्यासू व्यक्ती आहेत

जेडीयू आमदार गोपाल मंडल यांनी राहुल गांधींचे 'विद्वान' असे वर्णन केले. ते पुढे म्हणाले की, ''I.N.D.I.A. महाआघाडीत पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. खर्गे यांना कोण ओळखते? राहुल गांधींना उमेदवार केले असते तर बरे झाले असते. लोक त्यांना ओळखतात. गांधी घराणे राजकारणातील सर्वात जुने आहे. राहुल खूप मेहनत घेत आहेत. देशभर पायी प्रवास करत आहेत. ते एक सुशिक्षित आणि अभ्यासू व्यक्ती आहेत.''

आमदाराचे I.N.D.I.A. आघाडीला इशारा

आमदार गोपाळ मंडल यांनी I.N.D.I.A. आघाडीला इशारा दिला. भाजपविरुद्ध जिंकणे सोपे नाही, असे त्यांनी आघाडीबाबत सांगितले. यावेळीही भाजपने निवडणूक जिंकली तर देश उद्ध्वस्त होईल. नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवल्याशिवाय इंडिया आघाडी निवडणुकीत विजय मिळवू शकणार नाही. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तर विजयाची शक्यता जास्त आहे. इंडिया आघाडी जिंकली तर देशाचे आणि देशवासीयांचे भले होईल, असेही शेवटी मंडल म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT