Bihar: भाजप आमदार म्हणतात, 'CM नितीश कुमार यांनी गोव्याचे राज्यपाल व्हावे, तरच त्यांना शांती मिळेल'

बबलू यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
Bihar
BiharDainik Gomantak

Bihar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत माजी मंत्री आणि भाजप आमदार नीरज कुमार बबलू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बबलू यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गोव्याचे राज्यपाल व्हावे, तरच त्यांना शांती मिळेल, असे वक्तव्य नीरज कुमार बबलू यांनी केले आहे.

माजी मंत्री आणि छटापूरचे भाजप आमदार नीरज कुमार बबलू यांनी बिहारमधील सहरसा येथे रविवारी (24 डिसेंबर) पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बबलू यांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. इंडिया आघाडीच्या बिहारमधील अवस्थेमुळे नितीशकुमार सध्या दबावाखाली जगत आहेत. दबावामुळे नितीशकुमार विचित्र गोष्टी करत असून, विचित्र वक्तव्य देखील करत आहेत.

'मला वाटते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एकदा माननीय पंतप्रधान यांच्याशी बोलून गोव्याचे राज्यपाल व्हावे. तेच त्यांच्यासाठी चांगले होईल, त्यांना शांती मिळेल. मला वाटते की मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आता शांततापूर्ण नोकरीची गरज आहे आणि गोव्यात गेल्याने त्यांना शांतात मिळेल.

गोव्याला जाण्याने नितीश कुमार यांची तब्येतही चांगली राहील. म्हणूनच त्यांनी प्रयत्न करायला हवेत, असे नीरज कुमार बबलू म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com